सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे - डॉ. राजेंद्र गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2017 06:03 PM2017-05-14T18:03:08+5:302017-05-14T18:03:08+5:30

भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल

All Republican parties should be assembled - Dr. Rajendra Gavai | सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे - डॉ. राजेंद्र गवई

सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे - डॉ. राजेंद्र गवई

Next

ऑनलाइन लोकमत
 

भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - भुसावळला जिल्ह्याचा दर्जा मिळावा ही आमची प्रमुख मागणी असून शासनाने दखल न घेतल्यास राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल, असे माहिती आरपीआय गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ.  राजेंद्र गवई यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली़ सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल, असेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकांचा आढावा व कार्यकत्र्याशी हितगुज साधण्यासाठी ते रविवारी भुसावळ शहरातील शासकीय विश्रागृहावर दुपारी दाखल झाल़े
 डॉ. गवई म्हणाले की, भुसावळ विधानसभेसाठी आमचे राजू सूर्यवंशी हेच उमेदवार असतील तर भुसावळसह दर्यापूरच्या जागेवर आमचा दावा असणार आह़े या जागा आम्हाला न मिळाल्यास आम्ही स्वबळावर लढणार आहोत़
सर्व रिपब्लिकन पक्षांचे एकत्रीकरण करावे या मताचा मी आहे मात्र त्यासाठी घाई अयोग्य ठरेल़ या  संदर्भात रामदास आठवले यांच्याशी चारवेळा बैठक झाली़ रिपब्लिकन पक्ष आठवले नव्हे तर आंबेडकर यांच्या नावाने असून आठवलेंचा पक्ष वाचवण्यासाठी मात्र आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितल़े
शेतक:यांना कजर्माफी  करावी या मतावर आपण ठाम असून रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला़ संघर्ष यात्रेतून प्रश्न न सुटल्यास महासंघर्ष करणार असल्याचे त्यांनी सांगत विरोधकांनी संघर्ष यात्रा एसटीतून काढावी व चटणी-खाकरी खावून काढावी, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला़  कजर्माफी न झाल्यास मतदार सत्ताधा:यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत नोटबंदीचा निर्णय अत्यंत घाईत घेण्यात आला त्यामुळे अद्यापही नागरिकांचे हाल होत असल्याचे त्यांनी सांगितल़े
मुख्य निवडणूक आयुक्त ज़ेएस़सहारीया यांनी आपल्याला नवीन मतदान यंत्र दाखवले असून त्यात कोणत्या पक्षाला मतदान केले याची चिठ्ठल मिळणार आहे मात्र यावर आपण समाधानी नाही तर निघालेली चिठ्ठी व यंत्रात झालेल्या मतदानाची मोजणी व्हावी, अशी आपली मागणी आह़े
प्रसंगी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य अर्मनराव खंडारे, जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, नगरसेवक रवी सपकाळे, युवा जिल्हाध्यक्ष मनोहर सुरडकर व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होत़े

Web Title: All Republican parties should be assembled - Dr. Rajendra Gavai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.