नगरपरिषदेच्या निर्णयबद्दल पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:12 AM2021-07-03T04:12:22+5:302021-07-03T04:12:22+5:30

नशिराबाद : नशिराबाद हे तालुक्यातील मोठे गाव असून नगरपरिषदेच्या माध्यमातून याच्या विकासाला गती येणार असून येथील समग्र विकासासाठी आपण ...

All-round felicitation of the Guardian Minister for the decision of the Municipal Council | नगरपरिषदेच्या निर्णयबद्दल पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार

नगरपरिषदेच्या निर्णयबद्दल पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार

Next

नशिराबाद : नशिराबाद हे तालुक्यातील मोठे गाव असून नगरपरिषदेच्या माध्यमातून याच्या विकासाला गती येणार असून येथील समग्र विकासासाठी आपण कटीबध्द आहोत. सर्वांच्या सहकार्याने येत्या काळात नशिराबादचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची ग्वाही शनिवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

नशिराबाद येथे नगरपरिषदेची घोषणा झाल्यानंतर शनिवारी पालकमंत्र्यांचा सर्वपक्षीय सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री पाटील बोलत होते. शहराच्या विकासासाठी वर्षभरात १५ कोटींचा निधी देण्यात येणार असून यात महिनाभरात दीड कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. नगरपरिषद झाल्याने आधीच्या ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा मोठा लाभ होणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी नशिराबाद येथील नगरपरिषदेची अधिसूचना निघाली. आपला शब्द पाळला म्हणून नशिराबाद येथे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी पालकमंत्री पाटील यांचा सत्कार केला. याला उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी गावाच्या विकासात राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. नशिराबाद येथे सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांमध्ये सलोखा असल्याची बाब ही अतिशय कौतुकास्पद आहे. यामुळे ग्रामपंचायतीसाठी दाखल करण्यात आलेले चारशे अर्ज मागे घेण्याची बाब शक्य झाली. आता देखील नगरपरिषदेची निवडणूक बिनविरोध करता आल्यास प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावात निवडणुकीसाठी हवा भरणारे असतात, अशा हवा भरणार्‍यांपासून सावध राहण्याचे पालकमंत्री म्हणताच सभागृहात हशा पिकला.

कर्मचार्‍यांनाही होणार लाभ

नशिराबाद येथे आता नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात येणार असून यात तब्बल दरडोई १३५ लीटर प्रति दिन इतके पाणी मिळणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरासाठी निधी मिळवून देणार असून लवकरच नगरपरिषदेला स्वत:ची इमारत मिळणार असल्याची घोषणा देखील पालकमंत्र्यांनी केली. ग्रामपंचायतीची नगरपरिषद होणार असल्याने येथील कायमस्वरूपी कर्मचार्‍यांना लाभ होणार असल्याची माहिती देखील त्यांनी केली.

यांची होती उपस्थिती

शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णु भंगाळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य विश्‍वनाथ पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, सरपंच विकास पाटील, उपसरपंच कीर्तीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकास धनगर, शिवसेना युवा प्रमुख चेतन बर्‍हाटे, राष्ट्रवादी शहर चिटणीस प्रा. विश्‍वनाथ महाजन, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक कार्याध्यक्ष बरकत अली, मनसे तालुकाध्यक्ष मुकुंद रोटे, ललित ब-हाटे, गणेश चव्हाण, भूषण पाटील, प्रदीप साळी, ग्रामपंचायत कर्मचारी, नागरिक, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. विश्‍वनाथ महाजन यांनी केले.

Web Title: All-round felicitation of the Guardian Minister for the decision of the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.