मिनी मंत्रालयांच्या रणधुमाळीत जि.प.चे सातही गट निघणार ढवळून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 02:01 PM2020-12-25T14:01:05+5:302020-12-25T14:03:02+5:30
७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सातही गट ढवळून निघणार आहे.
Next
ठळक मुद्देचाळीसगावला चुरशीच्या लढती :भाजपसह राष्ट्रवादीच्या गटनेत्यांची प्रतिष्ठा पणालापाच सदस्यांच्या होमपीचवरही सामने
च ळीसगाव : तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे सातही गट ढवळून निघणार आहे. ७६ गावे जि.प.चे सातही मतदार संघ विभागले गेले असल्याने राष्ट्रवादीच्या चार आणि भाजपच्या तीन सदस्यांसाठी ही रणधुमाळी २०२२ मध्ये होणा-या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम ठरावी. विशेष म्हणजे यातील पाच सदस्यांच्या गावांमध्ये निवडणूक होत आहे. २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने चार गटात विजय मिळवून वर्चस्व राखले आहे. भाजपचे 'कमळ' तीन गटात फुलले. पंचायत समितीच्या १४ गणांमध्ये सामना बरोबरीचा झाला आहे. भाजप आणि राष्ट्रवादीचे सात सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळेच १५ जानेवारी रोजी होणा-या ७६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २०२२ मध्ये होणा-या जि.प. आणि पं.स.निवडणुकांसाठी महत्वाच्या आहेत. ग्रा.पं.निवडणुकांमध्ये दोन लाख ४९ हजार ९९४ एवढ्या मोठ्या संख्येने मतदार असून तालुक्यातील एकूण मतदार संख्या पाहता जवळपास ७० टक्के मतदारांचा यात समावेश आहे. दोन्ही गटनेत्यांची प्रतिष्ठेची लढाईराष्ट्रवादीचे जि.प.मधील गटनेते शशिकांत साळुंखे यांच्या खेडगाव- बहाळ मतदारसंघातील काही गावांमध्येही ग्रामपंचायतींसाठी घमासान होत आहे. राजकीयदृष्ट्या लक्षवेधी असणा-या बहाळ गावातही १५ जागांसाठी निवडणूक होत आहे. कळमडू ग्रामपंचायतीसाठीदेखील १५ जागांसाठी निवडणुकीचा आखाडा सज्ज झाला आहे. भाजपचे जि.प.मधील गटनेते व माजी शिक्षण व अर्थ सभापती पोपट भोळे यांच्या 'वाघळी' या होम ग्राऊंडवरच सामना होत आहे. त्यामुळेच शशिकांत साळुंखे यांच्यासह त्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्यावेळी पोपट भोळे यांनी वाघळीच्या होमपीचवर निर्णायक खेळी करून बहुमताने सत्ता काबीज केली होती. यावेळी राष्ट्रवादीसोबत त्यांना भिडावे लागणार असल्याचे चित्र आहे. पाच सदस्यांच्या गावांमध्येही सामनेवाघळी-पातोंडा गटाचे सदस्य पोपट भोळे, बहाळ-कळमडू गटाचे - शशिकांत साळुंखे, तळेगाव-देवळी गटाचे अतुल देशमुख, सायगाव-उंबरखेडे गटाचे भूषण पाटील, करगाव-भोरस गटाच्या मंगला जाधव, रांजणगाव-पाटणा गटाच्या सुनंदा राठोड, मेहुणबारे-दहिवद गटाच्या मोहिनी गायकवाड. या सात जि.प. सदस्यांपैकी शशिकांत साळुंखे व अतुल देशमुख वगळता उर्वरित पाच सदस्यांच्या गावांमध्ये ग्रा.पं.निवडणूक होत आहे.1...भाजपचे पोपट भोळे यांचे वाघळी2..भाजपच्या मंगला जाधव यांचे तांबोळे बुद्रूक3...भाजपच्या मोहिनी गायकवाड यांचे भवाळी4...राष्ट्रवादीच्या सुनंदा राठोड यांचे पिंपरखेड5...राष्ट्रवादीचे भूषण पाटील यांचे सायगाव सायगावात चुरशीचा आखाडाउसाचे 'गोड' आगार म्हणून ओळखल्या जाणा-या सायगावात यावेळी चुरशीचा सामना रंगणार आहे. एकूण १५ जागांसाठी लढाई होईल. राष्ट्रवादीचे जि.प.सदस्य व जिल्हा नियोजन मंडळाचेही सदस्य भूषण काशिनाथ पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. गेल्यावेळी येथे भूषण पाटील व नथ्थू चौधरी यांच्या पॕनलने आठ जागा काबीज करुन मुसंडी मारली होती. प्रतिस्पर्धी धर्मा काळे व मारोती काळे यांनीही काट्याची टक्कर देत सात जागा राखल्या होत्या. होऊ घातलेल्या निवडणुकीत काळे यांच्या पॕनल सोबतच भूषण पाटील, अर्जुन माळी, गोकुळ रोकडे यांच्या संयुक्त पॕनलचा समना रंगणार आहे.