गावठी कट्ट्यांसह तिघे जाळ्यात

By admin | Published: July 5, 2016 04:21 PM2016-07-05T16:21:19+5:302016-07-05T16:21:19+5:30

गावठी कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या मुसक्या सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने आवळत तीन जिवंत काडतुसे व कट्टे जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे़

All the snakes are strapped with holes | गावठी कट्ट्यांसह तिघे जाळ्यात

गावठी कट्ट्यांसह तिघे जाळ्यात

Next

ऑनलाइन लोकमत
भुसावळ, दि. ५ : गावठी कट्ट्यांची विक्री करण्याच्या उद्देशाने आलेल्या तिघांच्या मुसक्या सोमवारी बाजारपेठ पोलिसांच्या डीबी पथकाने आवळत तीन जिवंत काडतुसे व कट्टे जप्त केल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे़ जंक्शन शस्त्र विक्रीचे केंद्र ठरत असल्याची बाब या घटनेने पुन्हा अधोरेखीत झाली आहे़. 

शेख उमर शेख उस्मान (२४), अनिकेत उर्फ बब्बू संजय नागपूरे (२१, दोन्ही रा़शिवाजीनगर, भुसावळ) व दीपक उर्फ कुणाल भुरालाल जारवार (२२, रामदासवाडी, हनुमान मंदिराजवळ, भुसावळ) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत़

गुप्त माहितीवरून कारवाई शहरातील घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ काही तरुण शस्त्र विक्रीच्या उद्देशाने आल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक रोहिदास पवार व निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांना मिळाल्यावरून डीबी पथकाचे हवालदार निशिकांत जोशी, इरफान काझी, सुधीर विसपुते, सुनील थोरात, वाल्मीक सोनवणे, तुषार जावरे, संजय पाटील, युसूफ तडवी, प्रशांत चव्हाण, नीलेश बाविस्कर, श्रीकृष्ण देशमुख, राहुल चौधरी, दीपक जाधव, महेंद्र लहासे आदींनी सोमवारी सकाळी सापळा रचून आरोपींवर झडप घातली़ आरोपींच्या अंग झडतीत प्रत्येकाकडे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली़ त्याचे एकूण बाजारमूल्य १५ हजार ६०० रुपये आहे़

आरोपींविरुद्ध गुन्हा
पोलीस नाईक सुनील सैंदाणे यांच्या फिर्यादीनुसार आरोपींविरुद्ध गुरनं ३८१/२०१६, आर्म अ‍ॅक्ट कलम ३/२५, मुंबई पोलीस अ‍ॅक्ट १९५१ चे कलम ३७ (१) ३ चे उल्लंघण १२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला़

Web Title: All the snakes are strapped with holes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.