चाळीसगावसह सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 10:27 PM2019-09-26T22:27:49+5:302019-09-26T22:28:21+5:30

टंचाई उपाययोजना बंद

In all the talukas along with Chalisgaon, the number of rains crosses | चाळीसगावसह सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार

चाळीसगावसह सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार

Next

जळगाव : यंदा वरुणराजाने संपूर्ण जिल्ह्यावर कृपा केल्याने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाची शंभरी पार झाली असून कमी पाऊस असलेल्या चाळीसगाव तालुक्यातही गुरुवारी एकाच दिवसात ३६.१ मि.मी. पावसाची भर पडून तो ६५६.६ टक्क्यांवरून ६९२.७ मि.मी.वर पोहचला. त्यामुळे या तालुक्याने शंभरी ओलांडत तेथे २६ सप्टेंबरपर्यंत १०४.९ टक्के पाऊस झाला. विशेष म्हणजे या तालुक्याने जळगाव व धरणगाव तालुक्यालाही मागे टाकले आहे. जिल्ह्यात रावेर तालुक्यात तर ४०.३ टक्के जास्त पाऊस झाला आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्व दुष्काळी उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत.
उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने जिल्ह्यात सर्वांची चिंता वाढविली होती. मात्र त्यानंतर झालेल्या जोरदार व सलग पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र आबादानी झाली. यात अगोदर जामनेर तालुक्यात सर्वात जास्त पाऊस झाला. त्यानंतर मात्र रावेर व यावल तालुक्यात पावसाचा जोर वाढल्याने या दोन्ही तालुक्यात यंदाचा सर्वात जास्त पाऊस झाला आहे.
गेल्या आठवड्यात केवळ जळगाव, धरणगाव व चाळीसगाव तालुक्यांचीच पावसाची शंभरी गाठायची बाकी असताना जळगाव व धरणगाव तालुक्यातही १०० टक्के पाऊस झाला. २६ सप्टेंबरपर्यंत या दोन्ही तालुक्यात अनुक्रमे १०३.४ व १०३.३ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
२५ सप्टेंबरपर्यंत केवळ चाळीसगाव तालुक्याचीच शंभरी गाठायची बाकी होती. असे असले तरी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या महिन्यापर्यंत या तालुक्यात सर्वात कमी म्हणजेच ८० टक्केच्या आतच पाऊस होता. मात्र पावसाच्या संततधारेने या तालुक्याचीही पावसाची सरासरी २५ रोजी ९९.४ टक्क्यांवर पोहचली व त्यात २६ रोजी आणखी साडेपाच टक्के पावसाची भर पडून चाळीसगाव तालुक्याने शंभरी ओलांडली.
दुष्काळी उपाययोजना बंद
जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठवड्यापर्यंत तीन गावांना चार टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील हे टँकर बंद करण्यासह इतरही दुष्काळी उपाययोजना बंद करण्यात आल्या आहेत.


तालुकानिहाय पाऊस
तालुका टक्केवारी
जळगाव १०३.४
जामनेर ११८.९
एरंडोल १२०.२
धरणगाव १०३.३
भुसावळ १२२.०
यावल १२५.१
रावेर १४०.३
मुक्ताईनगर ११८.४
बोदवड १२५.५
पाचोरा ११३.०
चाळीसगाव १०४.९
भडगाव १०६.३
अमळनेर १११.०
पारोळा ११२.८
चोपडा ११५.६
एकूण ११६.१

Web Title: In all the talukas along with Chalisgaon, the number of rains crosses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव