भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 05:13 PM2020-08-26T17:13:17+5:302020-08-26T17:14:41+5:30

श्रीरामनगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी (३२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

All three accused in Bhusawal youth murder case arrested | भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

भुसावळ येथील तरुणाच्या हत्या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक

googlenewsNext
ठळक मुद्देफोनवर बोलत असताना केला हल्ला १० ते १५ मिनिटे सुरू होता थरारएसपी व अपर पोलीस अधीक्षक यांची घटनास्थळी भेट

भुसावळ : शहरातील श्रीरामनगर भागातील रहिवासी विलास दिनकर चौधरी (३२) या तरुणाच्या हत्येप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मयत विलास चौधरी व संशयित आरोपींमध्ये २२ रोजी किरकोळ वाद झाला होता. त्या वादातून ही घटना रात्री अकराच्या सुमारास घडली होती. मयत विलास यांचे वडील दिनकर लक्ष्मण चौधरी यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास दिनकर चौधरी (३२) हा २५ रोजी रात्री अकराच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराबाहेर सिमेंटच्या बेंचवर बसून फोनवर बोलत होता. त्यावेळी संशयित आरोपी अक्षय न्हावकर, अभिषेक शर्मा व आकाश गणेश पाटील (राजपूत) हे तरुण मोटारसायकलीने आले. त्यांनी विलासवर चाकूने वार केला. हा हल्ला विलासच्या दंडावर झाला. यावेळी विलास हा घाबरून घरात पळत गेला व घराची कडीकोंडा बंद केला. विलासचा आवाज ऐकून त्याचे वडील व आई हेही आरडाओरड करू लागले. विलासच्या दंडातून रक्तस्राव होत असल्यामुळे त्याच्या दंडावर आईने कापडी पट्ट््या बांधण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत तीन आरोपी घराबाहेर उभे होते. यावेळी विलास यांनी मित्रांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पाच मिनिटानी तीनही आरोपींनी विलासच्या घराच्या मागील बाजूच्या दरवाजावर फरशीने घाव करून दरवाज्याचा कडीकोंडा तोडला. यावेळी विलास पुढच्या खोलीतून मागे धावत आला. तीनही आरोपी घरात शिरले असल्याचे पाहून त्याचे आई वडील आरडाओरड करू लागले. तोपर्यंत अभिषेक शर्मा याने पिस्तोल् मधून विलासच्या छातीवर गोळी मारली . यावेळी विलास हा घरात कोसळला. १० ते १५ मिनिटे हा थरार सुरू होता. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून धाव घेतली.
घरामध्ये रक्ताचा सडा पडला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी विलास चौधरी गंभीर अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. डीवायएसपी गजानन राठोड घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, गुरुवारी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत विलास यांच्या वडिलांशी चर्चा केली. यावेळी डीवायएसपी गजानन राठोड, पोलीस निरीक्षक दिलीप भागवत हेही उपस्थित होते.

Web Title: All three accused in Bhusawal youth murder case arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.