ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 01:07 PM2019-05-30T13:07:55+5:302019-05-30T13:11:11+5:30

शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी

All time in the market for Eid purchase | ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग

Next

जळगाव : मुस्लीम बांधवांचा सर्वात मोठा रमजान ईद सण अवघ्या आठ दिवसांवर आला असून या सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शहरातील विविध मार्केटमध्ये गर्दी होत असून समाजबांधवांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
रमजान महिन्याचा शेवटचा आठवडा शिल्लक असल्याने बाजारात ईदच्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी अनेकजण बाहेर पडल्याने बाजारपेठ फुलली आहे. शहराच्या अतिशय मध्यवर्ती आणि सर्व प्रकारच्या चीजवस्तू हमखास मिळणाऱ्या महात्मा फुले मार्केट आणि परिसरात महिला, लहान मुले-मुलींची झुंबड उडत आहे. सर्व प्रकारची पादत्राणे, कपडे, बेण्टेक्स ज्वेलरी, अत्तर, सुरमा, घरगुती सर्व वस्तू येथे मिळत असल्याने एकाच वेळी मनासारखी आणि हव्या त्या किमतीची वस्तू घेण्यासाठीही लगबग वाढली आहे.
बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन खरेदी केली असली तरी अनेकजण हाताला आवर घालताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई यामुळे हे प्रमाण कमी होत असल्याचे सांगितले जात आहे. एरव्ही प्रत्येक मुस्लीम बांधव रमजान महिन्यात व ईदसाठी मोठ्या प्रमाणात खरेदी करतातच. त्यामुळे महागाई वाढत असली तरी रमजान सणासाठी खरेदीचा उत्साह कायम आहे.
रेडिमेड कपड्यांकडे कल
युवा पिढीचा कल तयार कपड्यांकडे आहे. शहरात अनेक नामवंत कंपन्यांची दालने (शोरुम) आहेत. ऐपतदार वर्ग त्याकडे वळत आहे. अर्थात ते खिशाला नाही परवडले तर पारंपरिक, व्यवसाय-उद्योगाला योग्य कपडे आपल्या टेलरकडून वाजवी दरात शिवणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
बांगड्यांना मागणी
हिंदू बांधवांचा असो की मुस्लीम बांधवांचा सण, यासाठी महिलांचा खरेदीकडे मोठा कल असतो. त्यानुसार ईद सणासाठीही मुस्लीम महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून त्यांच्याकडून विविध प्रकारच्या बांगड्या, गळ््यातील हार, विविध साज यांची खरेदी करीत आहेत. यामध्ये दोºयात खडे विणलेल्या बांगड्यांना अधिक पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सोबतच आकर्षक हैद्राबादी सेट, जयपुरी सेट,विविध प्रकारातील काचेच्या बांगड्या बाजारपेठेत उपलब्ध असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शिरखुर्म्याचीही तयारी
सामाजिक सलोख्याचे प्रतीक असलेल्या ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव शिरखुर्मा तयार करून समाज बांधवांसह हिंदू बांधवांनाही आपुलकीने आमंत्रित करतात. या शिरखुर्म्याच्या घटक पदार्थांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सुक्यामेव्यासह शेवयांचीही मागणी वाढली आहे.
रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजारपेठेत उत्साह आहे. महिलांकडून विविध प्रकारच्या बांगड्या व इतर वस्तूही खरेदी केल्या जात आहे.
-ताहेर शेख, विक्रेते.
रमजान ईदसाठी कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. अनेक जण तयार कपड्यांना (रेडीमेड) पसंती देत आहे तर कोणी टेलरकडून कपडे शिवून घेत आहे.
-सुमीत हेमनाणी, विक्रेते.

Web Title: All time in the market for Eid purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव