हतनूर धरणातून आर्वतन सुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 06:16 PM2019-05-31T18:16:08+5:302019-05-31T18:16:56+5:30
हतनूर धरणातून पाण्याचे आर्वतन सुटल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकानां दिलासा मिळणार आहे.
वरणगाव, ता.भुसावळ, जि.जळगाव : हतनूर धरणातून पाण्याचे आर्वतन सुटल्याने विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने नागरिकानां दिलासा मिळणार आहे.
गुरुवारी धरणातील मृत साठ्यातून एक हजार क्युसेक पाणि सोडण्यात येवून सलग पाच दिवस दरोरोज एक हजार क्युसेक पाणी तापी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे वरणगावा शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा पूर्वपदावर येणार आहे. परिणामी पाण्यासाठी होणाऱ्या भटकंतीपासून नागरिकांना तूर्त दिलासा मिळणार आहे.
अखेरचे आर्वतन
या मोसमातील हे अखेरचे आर्वतन असल्याने पावसाळा १५ दिवसांपेक्षा अधिक लांबल्यास दुष्काळाच्या तीव्र झळा सोसण्याशिवाय पर्याय उरणार नाही, तर औद्योगिक क्षेत्रावरही याचा परिणाम जाणवणार आहे.
भुसावळ पालिकेचा बंधारा कोरडा पडला आहे. हेच पाणी बंधाºयात पोहचण्यासाठी अजून दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे.