आरोप २४०० वाहनांच्या नोंदणीचा मात्र जळगाव आरटीओ म्हणतात १५७ वाहनांचीच नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:13 AM2021-06-01T04:13:30+5:302021-06-01T04:13:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एप्रिल २०२० या कालावधीत जळगाव आरटीओ कार्यालयात २४०० नाही तर फक्त १५७ बीएस-४ वाहनांची ...

Allegation of registration of 2400 vehicles but Jalgaon RTO says registration of only 157 vehicles | आरोप २४०० वाहनांच्या नोंदणीचा मात्र जळगाव आरटीओ म्हणतात १५७ वाहनांचीच नोंदणी

आरोप २४०० वाहनांच्या नोंदणीचा मात्र जळगाव आरटीओ म्हणतात १५७ वाहनांचीच नोंदणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एप्रिल २०२० या कालावधीत जळगाव आरटीओ कार्यालयात २४०० नाही तर फक्त १५७ बीएस-४ वाहनांची नोंदणी झाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी ‘लोकमत’ला दिली. जळगावचे तत्कालीन वाहन निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात आरटीओतील कथीत भ्रष्टाचाराबाबत १४ पानांची तक्रार दिलेली आहे. मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या, पदोन्नत्या व वाहन नोंदणीतील गैरव्यवहाराचा त्यात उल्लेख केला आहे.

धुळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी जळगाव आरटीओ कार्यालयात एप्रिल २०२० या महिन्यात बीएस-४ ची २४०० वाहनांची नोंदणी केली व प्रत्येक वाहनामागे १२ हजार रुपये लाच स्वरूपात घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात जळगाव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांना विचारले असता, त्यांनी जळगाव कार्यालयातून या कालावधीत फक्त १५७ वाहनांची नोंदणी झाल्याचे सांगितले.

पोलीस उपायुक्तांना सादर केली माहिती

गजेंद्र पाटील यांची तक्रार मुळातच खोटी असून, सॉफ्टवेअरमध्ये गडबड करणे शक्यच नाही. तंत्रज्ञानामुळे संपूर्ण देशभर बसल्याजागी ही माहिती ऑनलाइन दिसते. लाॅकडाऊन सुरू होण्याच्या आधी मार्च २०२० मध्ये डीलरने १५७ वाहनांची नोंदणी केली होती, त्यानंतर एप्रिल महिन्यात लाॅकडाऊन सुरू झाला. मार्च महिन्यात विक्री झालेल्या वाहनांची नोंदणी करण्याबाबत परिवहन आयुक्तांनी आदेश दिले होते. ३० एप्रिलच्या आत या वाहनांची नोंदणी करणे बंधनकारक होते, त्यानुसार एप्रिल महिन्यात या वाहनांची नोंदणी झाली. नाशिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संजय बोरकुंड यांनी पत्र देऊन हीच माहिती विचारली होती. त्यांनाही अधिकृत माहिती देण्यात आल्याची माहिती लोही यांनी दिली.

चोपड्याच्या आमदारांनीही मागील वर्षी घेतली होती माहिती

चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी २३ जुलै २०२० रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देऊन २३ ते ३१ मार्च २०२० आणि २८ ते ३० एप्रिल यादरम्यान नोंदणी झालेल्या वाहनांची माहिती मागवली होती. आरटीओ कार्यालयाने आमदारांनाही माहिती पुरवलेली आहे. दरम्यान गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केलेले आहेत तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आरटीओ कार्यालयातून गेल्या वर्षी ही माहिती घेतली होती.

गजेंद्र पाटील यांच्याविरुद्ध विनयभंगाचाही गुन्हा

गजेंद्र पाटील यांच्याविरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात ३१ ऑक्टोबर २०१५ रोजी विनयभंग व ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. पाटील त्या काळात चोरवड चेक पोस्टवर ड्युटीला होते.

कळसकर यांनी फेटाळले आरोप

प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी जळगाव आरटीओ कार्यालयातून प्रत्येकी वाहन १२ हजार रुपये घेऊन २४०० वाहनांची नोंदणी करून त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप गजेंद्र पाटील यांनी तक्रारीत केला आहे. कळसकर यांनी मात्र सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून हा आरोप फेटाळला आहे. जळगाव कार्यालयाचे आपण नोंदणी अधिकारी किंवा अपीलीय अधिकारी नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार देखील आपणास नाहीत. आरोप करणारे अधिकाऱ्याची पार्श्वभूमी, त्यांचे वर्तन व त्यांनी यापूर्वी कुठे नोकरी केली आहे व तेथील कारकीर्द याची माहिती माध्यमांनी घ्यावी, असेही कळसकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Web Title: Allegation of registration of 2400 vehicles but Jalgaon RTO says registration of only 157 vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.