प्रकल्प कार्यालय आहारांच्या ठेक्यात गैरव्यवहाराचा आरोप
By admin | Published: June 16, 2015 02:52 PM2015-06-16T14:52:04+5:302015-06-16T14:52:15+5:30
आदिवासीप्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत बेकायदेशीरपणे ठेके दिले गेल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी विविध महिला बचत गटांनी केली आहे.
नंदुरबार : आदिवासीप्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत बेकायदेशीरपणे ठेके दिले गेल्याचा आरोप करीत चौकशीची मागणी विविध महिला बचत गटांनी केली आहे.
याबाबत बचत गटांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार प्रकल्प कार्यालयांतर्गत आहार निविदेत मर्जीतल्या ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. २५00च्या आतील दराच्या निविदा रद्द करण्यात येतील असे कुठलेही नियम व अटी-शर्ती नमूद केल्या नसतानाही महिला बचत गटांकडून २५00च्या आत भरण्यात आलेल्या निविदा रद्द करून मर्जीतील ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे.
याबाबत चौकशी होऊन निविदा प्रक्रिया तत्काळ रद्द करावी, अशी मागणीही बचत गटांतर्फे करण्यात आली आहे. ■ निविदा उघडण्याच्या वेळी महिला बचत गटांना जाणीवपूर्वक दूर ठेवून मर्जीतील ठेकेदारांना ठेका देण्यात आला आहे. एकीकडे महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याचा शासनाचा प्रयत्न असून प्रकल्प अधिकार्यांच्या कार्यपद्धतीमुळे त्यांना डावलण्यात आले आहे.