पुणे व इंदूर विमान सेवेसाठी `अलायन्स एअर` उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:16 AM2021-02-10T04:16:55+5:302021-02-10T04:16:55+5:30
जळगाव : अहमदाबाद, मुंबईनंतर आता जळगाव येथून पुणे व इंदूरची सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, दिल्ली येथील `अलायन्स ...
जळगाव : अहमदाबाद, मुंबईनंतर आता जळगाव येथून पुणे व इंदूरची सेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, दिल्ली येथील `अलायन्स एअर` या विमान कंपनीने सेवा सुरू करण्याबाबत
अनुकूलता दर्शविली आहे. खासदार उन्मेश पाटील यांनी या सेवेबाबत मंगळवारी दिल्ली येथे या विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी भेट घेऊन, सेवा सुरू करण्याबाबत तासभर चर्चा केली.
गेल्या दीड वर्षापासून जळगाव विमानतळावरून हैदराबाद येथील `ट्रू जेट ` या कंपनीतर्फे अहमदाबाद ते जळगाव व जळगाव ते मुंबई सेवा देण्यात येत आहे. तसेच विमानतळावर आता नाईट लॅडिंगची सुविधा झाल्यामुळे, रात्रीच्या वेळीदेखील विमान उतरणार आहे. सर्व सुविधा जळगाव विमानतळावर झाल्यामुळे, या ठिकाणाहून पुणे व इंदुरसाठी विमानसेवा सुरू करण्याबाबत खासदार उन्मेश पाटील यांनी मंगळवारी `अलायन्स एअर` या विमान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हरप्रीत सिंह व मार्केटींग हेड मनू आनंद यांची भेट घेतली. या भेटीत उन्मेश पाटील यांनी आर.सी.एस. उड्डाण योजने अंतर्गंत पुणे व इंदुरची सेवा सुरू करण्याबाबत मागणी केली. जळगावहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी जवळ असल्यामुळे प्रवाशांचा या सेवेला चांगला प्रतिसाद लाभणार असल्याचे पटवून दिले. तसेच जळगाव शहरात व परिसरातील जिल्ह्यांमध्ये व्यापार, उद्योग वाढल्यामुळे व पर्यटनाच्या दृष्टी कोनातून विमानसेवेला अपेक्षित प्रवासी मिळणार असल्याचेही विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
इन्फो :
सेवेबाबत कंपनी अनुकूल
खासदारांनी या सेवेबाबत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तासभर चर्चा केली. तसेच विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनींही जळगाव विमानतळाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच या सेवेबाबत विमान कंपनी लवकरच निर्णय घेणार असल्याचे आश्वासन खासदार उन्मेश पाटील यांना दिले.