ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2020 12:04 AM2020-02-01T00:04:09+5:302020-02-01T00:05:42+5:30
ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले.
पारोळा, जि.जळगाव : ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्या महाविकास आघाडीचे सरकार सोडविणार असल्याचे आश्वासन काँग्रेसच्या जळगाव जिल्हा प्रभारी तथा माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव यांनी दिले.
पारोळा तालुक्यात महात्मा गांधी पुण्यतिथी पूजनाच्या निमित्ताने थांबल्या असता त्यांना निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी सांगितले की, मनरेगा कायदा आमच्याच सरकारने तयार केल्यामुळे ग्रामरोजगार सेवकांच्या प्रलंबित मागण्यावर रोहयो मंत्री यांना प्रत्यक्ष भेटून आणि शिफारस करून मागण्या मंजूर करण्यासाठी महत्वाची भूमिका राहील आणि तुमच्या मागण्या मान्य करायला लावेल.
‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत शासकीय काम करणारा ग्रामरोजगार सेवक हा शासन आणि ग्रामीण भागातील पात्र जॉब कार्डधारक मजूर यांच्यातील महत्वाचा घटक असून दुवा आहे. ग्रामरोजगार सेवकांच्या गेल्या १२ वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. फक्त आश्वासानेच पदरात पडलेली आहेत. मागण्यांवर कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. वास्तविक महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही महाराष्ट्र राज्याची जननी आहे. तरी त्या राज्यातील ग्रामरोजगार सेवक त्यांच्या मागण्यांपासून वंचित का आहेत, याचा अभ्यास करणे गरजेचे आहे’, अशी भूमिका या वेळी संघटनेतर्फे मांडण्यात आली.
यावेळी ग्रामरोजगार सेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटोळे आणि इतर तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.