जळगावातील रथ चौकात मतदारांना पैसे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 05:45 PM2018-08-01T17:45:02+5:302018-08-01T17:51:02+5:30

रथ चौकातील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर, बोटावर मोजण्याइतकेच मतदार रांगेत उभे होते. तर उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. सकाळी अकरापर्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.

Allocate money to voters in the chariot boundaries of Jalgaon | जळगावातील रथ चौकात मतदारांना पैसे वाटप

जळगावातील रथ चौकात मतदारांना पैसे वाटप

Next
ठळक मुद्देसकाळी ११ वाजेपर्यंत संथ मतदानमतदारांच्या खिशात टाकले जात होते पैसेदुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.

जळगाव : रथ चौकातील विठ्ठल मंदिराच्या पाठीमागे असलेल्या मतदान केंद्रावर सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर, बोटावर मोजण्याइतकेच मतदार रांगेत उभे होते. तर उमेदवारांचे प्रतिनिधीदेखील मतदान केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर उभे होते. सकाळी अकरापर्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरु होती. दुपारी बारानंतर मात्र मतदारांची संख्या वाढली.
पुरूष व महिला मतदारांना पैसे देऊन, मतदार केंद्राकडे रवाना केले जात होते. याच ठिकाणी पुढे गेल्यानंतर कार्यकर्ते ओळखीच्या मतदारांना एका बोळीत नेऊन, पैसे वाटप करीत होते. विशेष म्हणजे या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्याही हा प्रकार लक्षात आल्यानंतरदेखील कारवाई करण्यात आली नाही . फक्त केंद्राकडे जाणा-या प्रवेशद्वारावरच उभे राहून, वाहनांना अडवितांना दिसून आले.

Web Title: Allocate money to voters in the chariot boundaries of Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.