पाळधी येथे 57 दिव्यांगांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 05:50 PM2017-07-19T17:50:58+5:302017-07-19T17:50:58+5:30

दिव्यांगाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सहकार राज्यमंत्र्यांचे प्रतिपादन

Allotment of literature to 57 bodies in the palanquin | पाळधी येथे 57 दिव्यांगांना साहित्य वाटप

पाळधी येथे 57 दिव्यांगांना साहित्य वाटप

Next

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.19-दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी पाळधी येथे दिव्यांगांना साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी केले.
धरणगाव तालुक्यातील दिव्यांगासाठी आयोजित शिबिरातील लाभाथ्र्याना साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तर प्रमुख अतिथी म्हणून संघटक ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, जळगाव तालुकाप्रमुख नरेंद्र सोनवणे, धरणगाव पं.स.उपसभापती प्रेमराज पाटील, पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे, जि.प.सदस्य प्रताप पाटील उपस्थित होते. शिबिरात 57 लाभाथ्र्याना 18 सायकल, तीन व्हीलचेअर, 33 कुबडय़ा, 3 कर्णयंत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन  मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंद गोसावी यांनी केले. आभार पं.स.सदस्य मुकुंद नन्नवरे यांनी मानले.

Web Title: Allotment of literature to 57 bodies in the palanquin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.