केळी नुकसान भरपाईचे २८ लाख रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 05:46 PM2019-07-28T17:46:14+5:302019-07-28T17:46:33+5:30

समाधान : भडगाव तालुक्यातील ५ गावांना लाभ

Allotment of Rs 2 lakh for banana compensation | केळी नुकसान भरपाईचे २८ लाख रुपयांचे वाटप

केळी नुकसान भरपाईचे २८ लाख रुपयांचे वाटप

Next



भडगाव : गेल्या वर्षी झालेल्या केळी पिकाच्या नुकसानीची भरपाई तालुक्यातील ५ गावांना मिळाली आहे. यानुकसान भरपाईसाठी ६८ शेतकऱ्यांना २८ लाखांचे अुनदान वाटप केले जात आहे.
जून सन २०१८ मध्ये भडगाव तालुक्यातील वाडे, बांबरुड प्र ब, घुसर्डी, कजगाव, पासर्डी या ५ गावांंना वादळाने केळी पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. पिक नुकसानीचे पंचनामे करण्यास प्रशासनाकङुन टाळाटाळ होत होती. याबाबत ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्तही प्रसिद्ध केले होते. अखेर या वृतांची दखल घेत केळी पिक नुकसानीचे कृषी व महसुल प्रशासनाने पंचनामे केले होते. यानंतर या ५ गावांना ६६.७३ हेक्टर क्षेत्रासाठी एकुण २८ लाख ५६ हजार ५५५ रुपये अनुदान वाटपाची कार्यवाही भङगाव तहसिल प्रशासनामार्फत सुरु आहे. या अनुदानाचा लाभ एकुण ६८ शेतकर्यांना मिळाला आहे. याबद्दल शेतकऱ्यांनी लोकमतचे आभार मानले आहेत. शासनाने केळी पिक नुकसानीसाठी अनुदानाचा लाभ दिल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.
एक महिन्यापूर्वीही प्रचंड नुकसान
याचबरोबर मागील महीन्यातही प्रचंड वादळाने बोदर्डेसह परीसरात ७ ते ८ गावांचे केळी पिकाचे नुकसान मोठया प्रमाणात झाले होते. शासनाकडून मिळणारी नुकसान भरपाई हेक्टरी १३ हजार ५०० ही खूपच कमी आहे. खर्च पाहता ही अनुदानाची रक्कम हेक्टरी दिड लाख द्यावी अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी विधानसभेत अधिवेशनात मांडली होती. यानंतर शासनाने हेक्टरी ४३ हजार ५०० इतकी अनुदानाची रक्कम मंजुर केली आहे. या केळी पिक नुकसानीचे अनुदान आम्हालाही मिळावे अशी मागणी तालुक्यातील बोदर्डे, बोरनार, घुसर्डी, कोठली, निंभोरा, पांढरद, बात्सर, वडजी आदी गावांमधील केळी पिक नुकसानग्रस्त शेतकरी वगार्तुन होत आहे.
काही शेतकरी वंचितच
वर्षभरापाूसन काही शेतकºयांचे केळी पिक नुकसानीचे पंचनामे होऊनही ते अनुदानाच्या लाभापासुन वंचित असल्याच्या तक्रारी कानी पडत आहेत. वाडे पसिसरात केळी पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले होते. या परिसरात एकुण ३९ शेतकºयांना एकुण १५ लाख ४० हजार अनुदानाचा लाभ मिळाला आहे.

Web Title: Allotment of Rs 2 lakh for banana compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.