जामनेर येथे ३०० रुग्णांना चष्मे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2019 04:40 PM2019-08-07T16:40:26+5:302019-08-07T16:53:07+5:30

वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग जळगाव यांच्यामार्फत सुरू झालेल्या दृष्टीयज्ञ अभियानात बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.

Allotted glasses to 4 patients at Jamner | जामनेर येथे ३०० रुग्णांना चष्मे वाटप

जामनेर येथे ३०० रुग्णांना चष्मे वाटप

Next

जामनेर, जि.जळगाव : वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग जळगाव यांच्यामार्फत सुरू झालेल्या दृष्टीयज्ञ अभियानात बुधवारी येथील उपजिल्हा रुग्णालयात ३०० रुग्णांना चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांगांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
७ ते १४ आॅगस्ट या कालावधीत हे अभियान राबविले जाणार आहे. तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करण्यात आली. जामनेरला नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते चष्म्याचे वाटप केले गेले. डॉ.विनय सोनवणे, डॉ.तासखेडकर, डॉ.प्रशांत महाजन, डॉ.पांडुरंग आल्हाट व वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
जिल्हा समाजकल्याण अधिकारी एस.पी.गणेशकर, जितू पाटील, डॉ.प्रशांत भोंडे, चंद्रकांत बाविस्कर, आतिष झाल्टे, बाबूराव हिवराळे, सुहास पाटील आदी उपस्थित होते. पहूर, वाकोद, नेरी, गारखेडे, बेटावद, वाकडी, शेंदुर्णी, फत्तेपूर, लोहार, वालोड या केंद्रावर तपासणी झाली.

Web Title: Allotted glasses to 4 patients at Jamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.