चित्रपटगृहांना परवानगी द्या, अन्यथा परवाना रद्द करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:16 AM2021-03-20T04:16:05+5:302021-03-20T04:16:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, भाजी बाजार, हाॅटेल्स तसेच काही अटींवर ...

Allow cinemas, otherwise revoke licenses | चित्रपटगृहांना परवानगी द्या, अन्यथा परवाना रद्द करा

चित्रपटगृहांना परवानगी द्या, अन्यथा परवाना रद्द करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना जिल्ह्यातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने, भाजी बाजार, हाॅटेल्स तसेच काही अटींवर मंगल कार्यालये सुरू आहेत. मात्र चित्रपटगृहे सुरू करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटगृहांना परवानगी द्यावी अन्यथा परवाना रद्द करावा या आशयाचे निवेदन जळगाव जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघातर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

शासन व प्रशासनाला फक्त चित्रपटगृह सुरू असल्याने कोरोना होत असल्याचा समज असेल तर प्रशासनाने चित्रपटगृह कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश द्यावे, परवाना रद्द करावा व आपल्या मर्जीनुसार जागेवर व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सचिव महेंद्र लुंकड यांनी केली आहे.

कंजरभाट समाज वैकुंठधाम येथे वृक्षांची कत्तल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण येथील कंजरभाट समाजाची स्मशानभूमी येथे सुमारे २० ते ३० वर्षांपूर्वीच्या ५ ते ६ डेरेदार २० ते ३० फूट उंचीच्या वृक्षांची दिवसाढवळ्या कत्तल करण्यात आली. राज्य शासनाने वृक्ष लागवडीसाठी हजारो कोटींची योजना केली आहे. महानगरपालिकेची परवानगी न घेता वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना पदाधिकारी राहुल नेतलेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Web Title: Allow cinemas, otherwise revoke licenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.