खाजगी शिकवणी सुरू करण्यास परवानगी द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:14 AM2021-01-15T04:14:45+5:302021-01-15T04:14:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी शिकवण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या ९ महिन्यांपासून बंद असलेल्या खाजगी शिकवण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन गुरूवारी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशन व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
कोरोनामुळे गेल्या ९ महिन्यांपासून खाजगी शिकवण्या बंद आहेत. ऑनलाईन शिक्षण हे विद्यार्थ्यांना तितकेसे फायदेशिर ठरत नाहीये. दुसरीकडे शिकवणी चालक आर्थिक संकटात सापडले आहे. त्यामुळे पुण्याच्या धर्तीवर जळगावात सुध्दा शिकवणी सुरू करण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी प्रोफेशनल टिचर्स असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेवून केली. त्या चर्चेवेळी सोमवारपासून शिकवणी सुरू करण्यास परवानगी दिली व लवकरच पत्र काढणार असल्याची माहिती अभिषेक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.