पाटणादेवी येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:31+5:302021-07-12T04:11:31+5:30

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी हे पर्यटनस्थळ सध्या भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मात्र, येथे परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून नारळ, ...

Allow sale of Pooja material at Patnadevi | पाटणादेवी येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्या

पाटणादेवी येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्या

googlenewsNext

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी हे पर्यटनस्थळ सध्या भाविकांच्या दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मात्र, येथे परंपरागत गेल्या अनेक वर्षांपासून नारळ, गुलाल, हार, खण, ओटी हे पूजेचे साहित्य तसेच चहापान, नाश्ता विकणाऱ्या दुकानदार बांधवांना दुकाने लावण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. येथे पूजा साहित्य विक्रीची परवानगी द्यावी, अशी मागणी दुकानदारांनी खासदार उन्मेष पाटील यांच्याकडे केली आहे.

दुकानदार आपली कैफियत घेऊन खासदार जनसंपर्क कार्यालयात खासदार पाटील यांची भेट घेण्यासाठी आले होते. दुकानदारांनी खासदारांशी संपर्क करीत आपले गाऱ्हाणे मांडले. खासदारांनी विभागीय वनसंरक्षक विजय सातपुते यांना भ्रमणध्वनीद्वारे ही समस्या मांडली. यावर आठ दिवसांत त्यांना परवानगी द्यावी, अशी भूमिका मांडली.

खासदारांचे वनविभागाला पत्र

दुकानदारांना आपल्या पाटणादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या परंपरागत जागेत दुकाने पुन्हा सुरू करण्यासंदर्भात परवानगी द्यावी, असे पत्र खासदार उन्मेष पाटील यांनी वनविभागाला दिले आहे.

यावेळी पाटणा गावचे सरपंच नितीन चौधरी, रामकृष्ण देसले, मधुकर चौधरी, संजय खुटे, रावसाहेब दळवी, भगवान चौधरी, शरद धात्रक, आबा चौधरी, बापू चौधरी, अनिल देसले, प्रदीप वाणी, राजू वाघ, सोमेश चौधरी, राहुल धात्रक, आबा सोनवणे, अर्जुन सूर्यवंशी, शंकर चौधरी, समाधान चौधरी, नेताजी मोरकर, दीपक चौधरी, तुषार धात्रक, संतोष चौधरी, गुलाब पवार, विकास चकोर, अक्षय काळे, घनश्याम मोरे, अरुण चौधरी, लक्ष्मण सोनवणे, साहेबराव चौधरी, भाऊसाहेब दळवी, शंकर चौधरी, शशिकांत चौधरी, चेतन काळे, संदीप चौधरी, महेंद्र चौधरी, नितीन सोनवणे आदी दुकानदार बांधव उपस्थित होते.

Web Title: Allow sale of Pooja material at Patnadevi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.