एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:13 AM2021-06-04T04:13:14+5:302021-06-04T04:13:14+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम ...

Allow to start MS-CIT Govt | एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या

एमएस-सीआयटी शासनमान्य अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्ह रेट अगदी कमी होत आहे. त्यामुळे एमएस-सीआयटी हा शासनमान्य अभ्यासक्रम आता सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील संगणक संस्थाचालकांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यात एमकेसीएलची १५२ अधिकृत केंद्रे आहेत. केंद्रातून येणाऱ्या उत्पन्नातून लाइट बिल, इंटरनेट बिल, मनपा कर, शिक्षकांचा पगार अथवा मानधन आदी दैनंदिन खर्च होत असतो. परंतु, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यवहार थकले आहेत. केंद्रांमध्ये ७० टक्के अधिक प्रवेश उन्हाळ्याच्या मुद्रित म्हणजेच मार्च, एप्रिल, मे आणि जून या चार महिन्यात होतात. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्यानंतर हजारो विद्यार्थी एमएससीआयटी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीसाठी तसेच निमशासकीय व खासगी क्षेत्रात कामासाठी लाभदायी आहे. परंतु, प्रदीर्घ काळापासून प्रवेश बंद आहे. अभ्यास केंद्रे किती महिने आणखी बंद राहील, हाही एक प्रश्न आहे. केंद्रांमध्ये इलेक्ट्रिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जास्त काळ बंद राहिल्यास निकामी होण्याचा धोका आहे, असे झाल्यास केंद्रांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसेल. त्यामुळे ही केंद्रे सुरू करण्यासाठी फिजिकल डिस्टन्स व इतर नियम पाळण्याची हमीही नमूद केलेली आहे. निवेदन देताना संगणक संस्थाचालक उमाकांत बडगुजर, प्रवीण जाधव, महेंद्र बारी, दिग्विजय तिवारी, अभिजित थोरात, योगेश पाटील, राजेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

Web Title: Allow to start MS-CIT Govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.