चाळीसगावला पेरण्यांची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:11 AM2021-06-30T04:11:09+5:302021-06-30T04:11:09+5:30
मान्सूनपूर्व पावसाने गर्दी करीत तालुक्यातील बळीराजाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तालुक्यात ७३ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला. यानंतर दिनांक ८ ...
मान्सूनपूर्व पावसाने गर्दी करीत तालुक्यातील बळीराजाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. तालुक्यात ७३ मिमी मान्सूनपूर्व पाऊस झाला. यानंतर दिनांक ८ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. तुरळक पावसाची हजेरी वगळता जवळपास १८ दिवस पर्जन्यमानाची हजेरी निरंक राहिली. काही प्रमाणात १८ ते २० दरम्यान पाऊस पडला. मात्र, तो पेरणीयोग्य नव्हता. रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने मात्र ग्रामीण भागातील जनजीवनाला जणू गती मिळाली असून, शेती-शिवारं गजबजून गेली आहेत.
चौक
दुबारचे संकट दूर, बागायतीलाही बुस्टर डोस
कोरडवाहू क्षेत्रात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर धूळपेरणीत कपाशी लागवड केली जाते. एकूण क्षेत्रापैकी जवळपास पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी दरवर्षी जुगार खेळतात. यावर्षी पावसाने मध्यंतरी ओढ घेतल्याने या पेरणीवर दुबारचे सावट गडद झाले होते. मात्र, गत दोन ते तीन दिवस पावसाने काहीवेळ का असेना छत्री धरल्याने या पेऱ्याला जीवदान मिळाले आहे.
१...सिंचनाखालील कपाशी पिकालादेखील रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने बुस्टर डोस मिळाला आहे. उन्हाचा वाढलेला पारा, पावसाची ओढ यामुळे सिंचनाखालील पेरा जगवताना शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होत होती.
२...विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने कुठेही नुकसानीची नोंद नाही.
३...खोळंबलेल्या पेरण्यांना या पावसाने गती दिली आहे.