कपाशी लागवडीसाठी लगबग सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:12 AM2021-06-06T04:12:57+5:302021-06-06T04:12:57+5:30

कजगाव, ता. भडगाव : परिसरात मान्सूनपूर्व पावसाचे दि.४ च्या सायंकाळी जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामाला आता वेग ...

Almost started for cotton cultivation | कपाशी लागवडीसाठी लगबग सुरू

कपाशी लागवडीसाठी लगबग सुरू

Next

कजगाव, ता. भडगाव : परिसरात मान्सूनपूर्व पावसाचे दि.४ च्या सायंकाळी जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामाला आता वेग आला आहे. रानात सर्वदूर कपाशी लागवडीचे चित्र दिसत आहे. कृषी केंद्रावर बी-बियाण्यांसाठी तर सराफाकडे ऐवज मोडण्यासाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसत होते.

मान्सूनपूर्व पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांनी दाखल होणाऱ्या मान्सूनबाबत आणखीनच अपेक्षा आहेत. संध्याकाळी ५.३० वाजेदरम्यान सुरुवात झालेल्या पावसाने सुमारे एक तासाहून अधिक वेळपर्यंत हजेरी लावली.

पावसाळा योग्यवेळी सुरू होणार, असे शुभसंकेत आहेत. त्याची सुरुवात कजगाव परिसरात झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरीबांधवांत आनंदी वातावरण निर्माण झाले. दि.४ रोजी झालेल्या दमदार पावसामुळे दि.५ रोजी सर्वदूर शेतशिवारात कपाशी लागवडीसाठीची लगबग सुरू होती, तर कृषी केंद्रावरदेखील बी- बियाणे घेण्यासाठी गर्दी झाली होती. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून ‘ब्रेक द चेन’मुळे ग्रामीण भागातील सारे व्यवहार ठप्प पडले आहेत. याचा मार शेतकरी, शेतमजूर यांनादेखील बसला आहे. यामुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शेती मशागत, पेरणी, बी- बियाणे, खत यासाठी तजवीज करण्यासाठी काही शेतकरी ऐवज मोडण्यासाठी सराफाकडे, तर काही बँकेत ऐवज तारण ठेवून पैसे उपलब्ध करतात.

===Photopath===

050621\05jal_2_05062021_12.jpg

===Caption===

मान्सूनपूर्व पावसाचे दमदार आगमन होताच कपाशी लागवडीसाठी लगबग सुरु झाली आहे.

Web Title: Almost started for cotton cultivation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.