मक्यापाठोपाठ ज्वारी खरेदी केंद्रही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 10:16 PM2020-12-31T22:16:59+5:302020-12-31T22:18:07+5:30
बोदवड येथे शासकीय मका खरेदी बंद करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बोदवड : बोदवड येथे शासकीय मका खरेदी बंद करण्यात आली. ती पुन्हा सुरू करावी तसेच नोंदणी असलेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यावरुन वाद सुरू असतानाच ३० रोजी रात्री १० वाजता शासनाचे एक पत्र धडकले आणि बोदवडचे शासकीय ज्वारी खरेदी केंद्र रातोरात बंद करण्यात आले.
ज्वारी खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी बंद करण्याचे आदेश सेल परचेस (खरेदी विक्री ) संघाला या पत्रात देण्यात आले होते. यामुळे ज्वारी विक्रीसाठी रांगेत असलेल्या शेतकऱ्यांना ऐनवेळी परत जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
तालुक्यात ५९ शेतकऱ्यांनी ज्वारी खरेदीसाठी नावे नोंदवली होती. यात फक्त बोदवड तालुक्यातील ३७ शेतकऱ्यांची ४७६ क्विंटल ज्वारी मोजली गेली आहे तर अजून २२ नोंदणीकृत शेतकरी ज्वारी मोजणीच्या प्रतीक्षेत आहे,