राज्यासोबतच जिल्ह्याचाही क्राईम रेट घटला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:16 AM2021-03-17T04:16:44+5:302021-03-17T04:16:44+5:30
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्याचाही क्राईम रेट घटला असून पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांवरून हे स्पष्ट होत आहे. दोष सिद्ध ...
जळगाव : राज्यासह जळगाव जिल्ह्याचाही क्राईम रेट घटला असून पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांवरून हे स्पष्ट होत आहे. दोष सिद्ध होण्याचाही जिल्ह्याचा दर वाढलेला आहे. खून, बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे घटले असले तरी पोक्सो व खुनाचा प्रयत्न यासारख्या गुन्ह्यात वाढ झालेली आहे. राज्याचा क्राईम रेट घटल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नुकतेच विधानसभेत सांगितले असता जिल्ह्याचा रेट कसा आहे याचा आढावा ‘लोकमत’ ने घेतला.
जिल्ह्यात गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले होते, यंदा आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु लॉकडाऊन अजून तरी लागू झालेले नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनमुळेही गुन्हे घटले आहेत. घरफोडी, चोरी व जबरी चोरीच्या गुन्ह्यातही जिल्ह्यात घट झालेली आहे. मालमत्तेचे गुन्हे घटले असले तरी शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात मात्र वाढ झाली आहे. खास करून खुनाचा प्रयत्न, हाणामारी, दंगल यासारखे गुन्हे वाढलेले आहेत.
दुचाकी व मोबाईल चोरीच्याही घटना तितक्याच वाढलेल्या आहेत. त्या तुलनेत गुन्हे उघडकीस आणण्याचा आकडा कमी आहे. मागील वर्षभरात जिल्ह्यात वेगवेगळ्या गुन्ह्यात ३२ गुन्हेगारांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.१४२ प्रकरणांचे न्यायालयांमध्ये कामकाज झाले त्यात ३२ जणांना शिक्षा लागली तर ११० प्रकरणांमध्ये संशयित निर्दोष सुटलेले आहेत. दोष सिद्धीचा दर हा २२.५४ इतका आहे. दोन वर्षापूर्वी हा दर फक्त ८ टक्के होता. एकूणच शिक्षेच्या प्रमाणात १५ टक्क्यांनी वाढ झालेली आहे.
राज्याप्रमाणेच जिल्ह्याचा क्राईम रेट जसा घटला आहे, तसाच दोष सिद्धीचा दरही वाढलेला आहे. सर्वाधिक १७ जणांना खुनाच्या गुन्ह्यात तर बलात्काराच्या गुन्ह्यात १० जणांना शिक्षा लागलेली आहे. ॲट्रासिटी, लाच प्रकरण व विनयभंगाच्याही गुन्ह्यात शिक्षा झाल्या आहेत.
जिल्ह्यात काय?
२०१९ २०२० २०२१
गुन्हे सिद्ध होण्याचा दर ८ २२. ५४ ००
बलात्कार १०४ ९१ १७
पोस्को ८१ ७६ ०८
हुंडाबळी ०४ ०२ ००
गृहमंत्री म्हणतात, राज्याचा क्राईम रेट घटला
-१४
टक्क्यांनी वाढला गुन्हे सिद्ध होण्याचा दर
-०५
ने घट झाली पोक्सो अंतर्गत गुन्ह्यात
-११
टक्क्यांनी बलात्काराच्या गुन्ह्यात घट
-२
ने अत्याचाराच्या गुन्ह्यात गट
जिल्ह्यात सर्वाधिक पोक्साेअंतर्गत गुन्हे
जिल्ह्यात दोन वर्षात बलात्काराच्या गुन्ह्यांपेक्षा पोक्सोअंतर्गत गुन्ह्यांचीच संख्या वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सव्वा दोन वर्षात बलात्काराच्या २१२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर पोक्सोच्या १६५ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, प्रत्यक्षात बलात्काराच्या आकडेवारीत काही गुन्हे पोक्सोचेही गुन्हे आहेत. त्यामुळे ही संख्या सर्वाधिक आहे.
जिल्ह्यात खुनाच्या गुन्ह्यातही घट
जिल्ह्यात २०१९ च्या तुलनेत मागील २०२० मध्ये खुनाच्या गुन्ह्यात ३ टक्क्यांनी घट झाली आहे. २०१९ मध्ये ६१ गुन्हे दाखल झाले होते. त्यापैकी ५९ गुन्हे उघड झाले होते तर मागील वर्षभरात ५८ गुन्हे दाखल झाले तर ५६ गुन्हे उघडकीस आले आहेत. खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांमध्ये मात्र ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ९५ गुन्हे दाखल होते तर मागील वर्षी १२७ गुन्हे दाखल झाले आहेत.