दारूबंदीच्या आंदोलनाला तांदलवाडी ग्रा.पं.ची साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:50 PM2017-09-03T17:50:20+5:302017-09-03T17:52:32+5:30
15 रोजी ग्रामसभा : महिलांनी दिले सरपंचांना निवेदन
ऑनलाईन लोकमत
खिर्डी,ता.रावेर, दि.3 - तालुक्यातील ऐनपूर येथील महिलांनी गावात दारुबंदी करीत क्रांतीकारी पाउल उचलल्याने त्यांची प्रेरणा घेत रविवारी तांदलवाडी येथील सुमारे 100 महिलांनी दारूबंदीसाठी सरपंचांना निवेदन दिले. ग्रामपंचायतीने देखील सहकार्य करण्याचे आश्वासन देत 15 सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभा बोलविली आहे.
रावेर तालुक्यातील तांदलवाडी येथे त्वरीत दारुबंदी करण्याची मागणी महिलांकडून होत आहे. रविवारी ग्रामपंचायत कार्यालयात जवळपास 100 ते 125 महिला जमा होऊन सरपंचांना याबाबत निवेदन देण्यात आले. दारूबंदीसाठी महिलांना सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच श्रीकांत महाजन यांनी दिले. तसेच 15 सप्टेंबर रोजी ग्रामसभा घेण्याचे जाहीर केले.
अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी
तांदलवाडी येथे देशी व हातभट्टीची दारुविक्री जोरात सुरु असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. 12 वषार्पासुन ते 60 वर्षार्पयतच्या मुला-माणसांना मद्यप्राशनाचे व्यसन आहे. त्यामुळे गावात अशांतता, भांडणे, मारामा:या व चो:यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
व्यसनाधिनतेमुळे तरुणांची आत्महत्या
दारूमुळे अनेक कुटुंबाच्या संसाराची राख रांगोळी झालेली आहे. दारुच्या व्यसनात तरुण पिढी बरबाद होत आहे. दारुच्या व्यसनामुळे गावांत तरुणांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. तसेच तरुणांचे दारुमुळे मृत्युचे प्रमाण वाढले आहे. या पुढे आणखी दारुच्या व्यसनांमुळे गैरप्रकार घडू नये म्हणून या सर्व बाबींची दखल घेऊन गावातील देशी व हातभट्टीची दारु त्वरीत कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी गावातील महिलांकडून होत आहे.
यावेळी तांदलवाडी सरपंच श्रीकांत महाजन, उपसरपंच कविता सपकाळे, ग्रा.पं.सदस्य नारायण पाटील, नितीन महाजन, किरण चौधरी, आशा चौधरी, योगिता महाजन, मंजुषा पाटील, सोनाली चौधरी, वैशाली झाल्टे, वंदना तायडे, ग्रामविकास अधिकारी डी. सी. पाटील आदी हजर होते.
तांदलवाडी येथील दारूबंदी साठी गावातील महिलांना सहकार्य करीत आहे. 15 सप्टेंबर रोजी गावात दारुबंदी साठी ग्रामसभा घेण्यात येणार आहे. याची माहिती जिल्हाधिकारी, रावेर तहसीलदार, उत्पादन शुल्क अधिकारी, पोलीस प्रशासन यांना दिली आहे. दारूबंदीचा ठराव करीत पुढील कृती करण्यात येईल.
- श्रीकांत महाजन, सरपंच.