भाजीपाल्यासोबत डाळही वधारू लागली; मसूर डाळीचा होतोय आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:12 AM2021-07-24T04:12:37+5:302021-07-24T04:12:37+5:30
स्टार ९५५ विजयकुमार सैतवाल जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ स्वरुपात होणारा पाऊस आता दमदार होत असल्याने त्याचा परिणाम ...
स्टार ९५५
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून किरकोळ स्वरुपात होणारा पाऊस आता दमदार होत असल्याने त्याचा परिणाम भाजीपाल्याच्या आवकवर होत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव वधारू लागले आहेत. या सोबतच डाळींच्या भावात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर त्यांच्या भावात सुधारणा होऊन भावातही काहीसी वाढ झाली आहे.
दरवर्षी उन्हाळ्यामध्ये भाज्यांचे भाव जास्त असतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनेक व्यवसायांवर निर्बंध असल्याने वेळेअभावी मागणी काहीसी कमी झाली. त्यामुळे भाज्यांचे भाव कमी राहण्यास मदत झाली. त्यात डाळींचे भावही वाढत असल्याने मसूर डाळीचा वापर केला जात आहे.
म्हणून डाळींच्या भावात वाढ
-मध्यंतरी केंद्र सरकारने कडधान्याच्या साठ्यावर मर्यादा आणल्याने डाळींचे भाव कमी झाले होते.
- आता केंद्र सरकारने कडधान्याच्या साठ्यावर आणलेली मर्यादा वाढविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा
- भाव एकदम कमी झाल्याने ती मोठी घसरण होती. या भावात आता सुधारणा झाली.
म्हणून भाजीपाला वधारला
गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्याने सर्वांची चिंता वाढली होती. मात्र या काळात भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव नियंत्रणात होते. मात्र आता पाऊस होत असल्याने शेतातून भाजीपाला काढता येत नसल्याने आवक कमी होऊन त्यांचे भाव वाढत आहे.
डाळींचे दर (प्रति किलो)
- तूरडाळ-९० ते ९४
- मूगडाळ-८५ ते ९०
-उडीदडाळ- ८५ ते ९०
-हरभरा डाळ-६२ ते ६६
-मसूर डाळ - ६० ते ६५
भाजीपाल्याचे भाव (प्रति किलो)
बटाटा - २० रुपये
कांदा - ३५ रुपये
टमाटे - ४० रुपये
काकडी - ४० रुपये
कोथिंबीर - ८० रुपये
पालक - ७० रुपये
मेथी - ८० रुपये
हिरवी मिरची - ६० रुपये
लिंबू - ४० रुपये
गवार - ५० रुपये
सर्वसामान्यांचे हाल
सध्या भाजीपाल्याचे भाव चांगलेच वधारले असून यामुळे कोरोनाच्या संकटात आर्थिक भारही वाढला आहे.
- शीला महाजन, गृहिणी
मध्यंतरी डाळींचे भाव कमी झाल्याने दिलासा होता. आता त्यात काहीसी वाढ झाली आहे. भरात भर म्हणजे भाजीपाल्याचेही दर वाढल्याने चिंता वाढली आहे.
- लता कोळी, गृहिणी