आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळे शुल्क कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:17 AM2021-09-11T04:17:55+5:302021-09-11T04:17:55+5:30

विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एलपीजी सिलिंडर वितरण करताना घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी करण्यास मनाई ...

Already in the house of a thousand cylinders; Why separate charges for home delivery? | आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळे शुल्क कशाला?

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळे शुल्क कशाला?

Next

विजयकुमार सैतवाल

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एलपीजी सिलिंडर वितरण करताना घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी करण्यास मनाई असली तरी शहरालगत असलेल्या शिरसोली, वावडदा, म्हसावद या गावांत सिलिंडर देताना ६० ते ७० रुपये अतिरिक्त शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारी आहेत. अगोदरच सिलिंडर ८९० रुपयांवर पोहोचले असून त्यात हा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.

गॅसच्या किमती एकीकडे दर महिन्याला वाढत असताना घरपोच डिलिव्हरी पुन्हा अतिरिक्त पैसे मोजले जातात. याची कुठलीही पावती दिली जात नाही. हे अतिरिक्त पैसे घेणे योग्य आहे?

असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एलपीजी सिलिंडर वितरण करताना घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी केल्यास या पुढे वितरकांवर थेट कारवाई केली जाणार असून तसा निर्णयच गॅस वितरण करणाऱ्या तीनही कंपन्यांनी घेतलेला आहे. यासंदर्भात जळगाव जिल्हा प्रशासनाने देखील असे शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश गेल्या वर्षी दिले आहेत.

यापूर्वी अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण विभागाच्या वतीने २००१, २००८ मध्ये गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या वितरकांसाठी घरपोच शुल्क निश्चित करून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर असे शुल्क आकारू नये, असे गॅस वितरण कंपन्यांचे म्हणणे होते. त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्र व्यवहारही केले. त्यानंतर असे शुल्क आकारू नये, असा निर्णय कंपन्यांनी घेतला. तसे आदेशही राज्यात सर्व प्रथम जळगाव जिल्हा प्रशासनाने काढले व घरपोच सिलिंडरसाठी शुल्क आकारू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते.

सध्याचा गॅस सिलिंडर दर - ८९० रुपये

शहरातील एकूण ग्राहक - ४१,०००

वर्षभरात ३०० रुपयांची वाढ

गॅस सिलिंडरचे दर प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. यामध्ये गेल्या वर्षभराचे दर पाहिले तर एका वर्षात गॅसचे दर ३०० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ५९९.५० रुपये सिलिंडरचे दर होते. ते आता ८९० रुपयांवर पोहोचले आहेत.

Web Title: Already in the house of a thousand cylinders; Why separate charges for home delivery?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.