केळीला बटाटा उत्पादनाचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 09:34 PM2020-03-13T21:34:41+5:302020-03-13T21:34:47+5:30
घटत्या जलपातळीवर मात : कृषीभूषण शशीकांत चौधरी यांची वेगळी वाट
यावल : दरवर्षी उद्भवणारीे नैसर्गिक संकटे आणि सतत खालावत असलेली जलपातळी यामुळे केळी पीक घेणे या भागात अवघड झाले आहे. यास चांगला पर्याय म्हणून बटाट्याचे उत्पादनही भालोद येथील कृषीभूषण शशीकांत चौधरी यांनी घेतले असून एकरी सव्वा लाखांची कमाई ते करीत आहे.
केळी उत्पादनासाठी अग्रेसर असलेल्या यावल तालुक्यात गेल्या २० वर्षात खालावलेली जलपातळी व सलगच्या चक्रीवादळाने केळी बागा घटल्या आहेत. यामुळे केळी उत्पादकांचे कंबरडेच मोडले आहे, यामुळे चौधरी यांनी उत्पादनात वेगळा मार्ग निवडला आहे.
खर्च कमी उत्पादन चांगले
1खर्चाचा व पाण्याचा आढावा सादर करतांना त्यांनी सांगितले की, बियाण्यासाठी चांगल्या प्रतीचा बटाटा एकरी १० क्विंटल लागतो. बियाणे, मशागत, खते व किटनाशके यासह एकरी २५ ते ४० हजार रुपये खर्च होत असल्याचे सांगून उत्पादन एकरी १२ ते १५ टन होत असल्याचे सांगितले. नवीन बटाट्याटाला प्रती किलो १० रुपये मिळाले तरी सव्वा ते ते दीड लाखाचे उत्पादन होते.