चिनावल विद्यालयात रंगले माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 05:56 PM2019-12-22T17:56:25+5:302019-12-22T17:58:53+5:30

नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९९६ ते १९९८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम २२ रोजी उत्साहात पार पडले.

An alumni association organized at Chinawal School | चिनावल विद्यालयात रंगले माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

चिनावल विद्यालयात रंगले माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेमुळे मी ही भावना अंत:करणात रूजवा -एस.सी.सरोदेविद्यार्थ्यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

चिनावल, ता.रावेर, जि.जळगाव : येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सन १९९६ ते १९९८ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन कार्यक्रम २२ रोजी उत्साहात पार पडले. २१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या सर्व वर्गमित्रांंनी जुन्या आठवणींना उजाळा देत यापुढे सर्वांनी एकत्रित येण्याचा मनोदय व्यक्त केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे माजी प्राचार्य एस.सी.सरोदे होते.
या वेळी या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी निमंत्रण दिल्यावरून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पी.आर.महाजन, प्राचार्य शारदा बैरागी, माजी ज्येष्ठ लिपीक सुरेश सरोदे, माजी शिक्षक एल.बी.फिरके ज्येष्ठ नाईक कन्हैया कडारे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किरण नेमाडे, चेअरमन किशोर बोरोले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देऊन आठवणी आदान-प्रदान केले. माजी विद्यार्थ्यांनी संगीत खुर्ची, अंताक्षरी यासारखे खेळ खेळले. सोबत असलेल्या त्यांच्या बालगोपाल चिमुकल्यांनी या स्नेहसंमेलनाचा आनंद लुटला.
यावेळी विद्यार्थी योगेश सरोदे, विवेक नेहते, पराग भंगाळे, अशोक राणे, विवेक महाजन, अविनाश पाटील, उमाकांत नेमाडे, भूषण नेमाडे, पराग महाजन, अजित सुपे, डॉ.शंतनू सरोदे, जितेंद्र बेंडाळे, ललित चौधरी, पंकज महाजन, प्रकाश भंगाळे, प्रशांत चौधरी, राजेंद्र जाधव, रवींद्र सपकाळे, सचिन महाजन, सचिन झोपे, ममता बेंडाळे, रंजना पाटील, भावना बोंडे, निशा महाजन, राजश्री नेमाडे, राजश्री महाजन, शीतल नेमाडे, सुवर्णा धांडे, पल्लवी महाजन, ज्योती बंगाळे, अपर्णा चौधरी, हर्षा टोके, हर्षा नेमाडे, नयना ठोंबरे, नीलिमा भारंबे, प्रिया भंगाळे, संगीता टोके, स्वाती लोखंडे, गायत्री महाजन, लिंगा पाटील, वीरेंद्र नेमाडे हे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना पाटील यांनी, प्रास्ताविक विवेक नेहते, तर आभार योगेश सरोदे यांनी मानले.

Web Title: An alumni association organized at Chinawal School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.