भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:20 PM2021-07-25T16:20:09+5:302021-07-25T16:21:03+5:30

वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा झाला.

Alumni meet at Nahata College | भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

भुसावळातील नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

googlenewsNext

भुसावळ : येथील पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा रविवारी झाला. अध्यक्षस्थानी ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मोहन फालक होते. आमदार संजय सावकारे यांनी उदघाटन केले.
ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी विष्णू चौधरी, आरपीएफ इन्स्पेक्टर संजय गायकवाड तसेच ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्याम दरगड, नीळकंठ भारंबे, प्राचार्या डॉ. मीनाक्षी वायकोळे, उपप्राचार्य डॉ.बी.एच.बऱ्हाटे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्य प्रा.शैलेश पाटील प्रमुख अतिथी होते.
हा मेळावा ऑनलाईनही घेण्यात आला. या मेळाव्यात विविध ११५ शहरातील माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या मेळाव्यात बऱ्याचशा माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला जी मदत आवश्यक असेल ती आम्ही देऊ, असे आश्वासन दिले.
यावेळी आमदार सावकारे यांनी यावेळी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांनी सढळ हातांनी आजी विद्यार्थ्यांना मदत करावी व आजी विद्यार्थ्यांकरिता भविष्यात आपण नवनवीन संकल्पना राबवू व आजी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. मोहन फालक, उपप्राचार्य डॉ.बी.एच. बऱ्हाटे, अजय भोळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील यांची मनोगते झाली.
प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ.जी.आर. वाणी यांनी केले तर ऋणनिर्देशन प्रा.हर्षल पाटील यांनी केले, सूत्रसंचालन मेघा चौधरी, ममता कोल्हे यांनी केले.
मेळावा यशस्वीतेसाठी आशिष चौधरी, प्रा.चंद्रकांत सरोदे, डॉ.गौरी पाटील, प्रा.दीपक पाटील, अजय भोळे, संतोष विनंते, प्रा.स्वाती शेळके, डॉ.सचिन येवले, डॉ.स्वाती फालक, डॉ.उमेश फेगडे, प्रा.संगीता भिरूड, डॉ. सचिन कोलते, डॉ.अजय क्षीरसागर, प्रा.महेश सरोदे, प्रा.शंकर पाटील, प्रा.जितेंद्र आडोकार, प्रा.दीपाली नेमाडे, प्रा.काजल वारके, प्रा. कल्याणी पाटील यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Alumni meet at Nahata College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.