सदा असावे हसतमुख
By admin | Published: April 30, 2017 04:34 PM2017-04-30T16:34:40+5:302017-04-30T16:34:40+5:30
वीकेण्ड या सदरात पत्र या विषयावर जयंत पाटील यांनी केलेले लिखाण
Next
>प्रिय केतू, सप्रेम आठवण
तुला हे पत्र बºयाच मोठ्या अवकाशानंतर लिहितोय, याची जाणीव आहे. केतू, आमचा भूषण नावाचा १८-१९ वर्षांचा नातू जो नाट्यक्षेत्रात रमला होता. तो हे जग मागील वर्षी सोडून गेला. त्याच्या वर्षश्राद्धाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला आसोदे (आपले मूळ गाव. जळगावपासून ५ कि.मीटरवर आहे. तिथे आपले घर अजून आहे.) येथून माझ्या सुना-वहिन्या-भाऊ आलेले. सारा स्त्रीवर्ग आपल्याकडे मानराजमध्ये आलेला. आईने साºयांना तुझे फोटो दाखवले. साºयांना तू आवडलीस. आपली आंगणबाग तर साºयांनी वारवाणली.
केतू, मागे एकदा नीरजच्या खोलीवर त्याची मैत्रीण आलेली तुला आवडले नाही. (हे मला नीरजनेच सांगितले आहे.) प्रेम एकावरच असते केतू. बाकी साºयांवर असते ती माया. नीरजचे जसे मित्र-मैत्रिणी आहेत, तसे तुझेही असणारच नां? आणि तुमचे माणूस प्राण्यावरच अगाढ प्रेम असेल तर मैत्रिचा हा सिलसिला जीवनभर सुरू असतो. यात फक्त परस्परांवर विश्वास असेल तर कुठेही कसलीही अडचण येत नाही. या बाबतीत मी अधिक स्नेहश्रीमंत आहे. माझ्या भरपूर मित्र-मैत्रिणी आहेत. आई आणि माझ्यात त्यावरून कधीही वाद नाही.
नीरजला कांजण्या झाल्या होत्या. त्या वेळी त्याची तू जी काळजी घेतलीस, त्याला रात्रीच्या वेळी ट्रॅव्हलवर सोडायलाही आलीस. (आम्ही तो वाकडेवाडीचा मार्ग नेहमी पाहतो ना.... ब्रीजच्या खालून जाणारा तो बोगद्याचा मार्ग तर आईला फारच भीतीदायक वाटतो.) त्याला ट्रॅव्हलवर सोडून तू तुझी अॅक्टिव्हा घेऊन एकट्याने परत गेलीस. तो बरा होऊन परतल्यावर तू पहाटे ५-५.३० ला उठून त्याला घ्यायलाही गेलीस. आम्हा दोघांनाही तुझे खूपच कौतुक वाटले. तुम्हा दोघांना आता गाडीही शिकून घ्यावी लागणार आहे. सततच्या पावसाने काहीसा गारठा वाढला आहे, घरातही थंडी वाजतेच.
तुझे आजोबा, अण्णांचा वाढदिवस आहे, हे तू सांगितलेस हे चांगले केलेस. फोनवर अण्णांशी माझे-आईचे बोलणे झाले. अण्णांचा आवाज मात्र तरुण आहे. अण्णा म्हणाले, ‘आता आपली भेट कधी?’
तुला कॉलेजने पुन्हा आॅर्डर दिली हे तुझ्या मेहनतीचे-सचोटीने शिकवण्याचे फळ आहे. विद्यार्थ्यांनीच तुझी मागणी केली, हे किती सुंदर? आपला शिक्षक-आपला डॉक्टर हवाहवासा वाटायला हवा. म्हणून छान कपडे घालावे. हसतमुख राहावे. आता आमची केतू मोठी झाली असे वाटते.... पण ती लहान बाळासारखी हट्टीही आहे, हेही छान आहे.
तुला आई आणि माझे प्रेमाशीष
तुझे-आई-बाबा.