अमळनेर नगरपालिके ची अतिक्रमण विरोधात मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 05:48 PM2017-07-25T17:48:39+5:302017-07-25T17:51:26+5:30
धुळे रस्त्यावरील 9 रहिवासी अतिक्रमण काढल्याने व्यापारी संकुलाचा प्रश्न मार्गी लागणार
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.25 - नगरपालिकेने पोलीस बंदोबस्ताशिवाय धुळे रोडवरील ट्रक टर्मिनल समोरील 9 रहिवासी अतिक्रमणे काढले. त्या रहिवाशांचे साहित्य घरकूल योजनेतील घरांर्पयत पोहचविण्यात आले. त्यामुळे पाच-सहा वर्षापासून प्रलंबित व्यापारी संकुलाचा प्रश्न मिटणार आहे.
गेल्या काही वर्षापासून धुळे रोडवरील कृउबा समोर ट्रक टर्मिनलच्या जागेवर नगरपालिकेने तीन गोदामे, व 22 गाळ्यांचे व्यापारी संकूल बांधले होते. मात्र रस्त्याच्या कडेलाच दुकानांसमोर रहिवासी व व्यावसायिक अतिक्रमण असल्याने, दुकानांचा वापर करता येत नव्हता. त्यामुळे नगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत होते. ट्रक टर्मिनलची बाब उच्च न्यायालयार्पयत गेली होती. दोनवेळा नगरपालिकेने अतिक्रमण काढण्याचा प्रय} केला. मात्र अतिक्रमणधारकांनी विरोध केल्यामुळे लिलाव प्रक्रिया रखडली होती. नगरपालिकेची आय.एच.एस.डी.पी. योजनेंतर्गतची म्हाडाची 462 घरे बांधून रिकामी पडलेली होती. म्हणून माजी आमदार साहेबराव पाटील, नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी शहरातील सर्वच अतिक्रमण धारकांशी चर्चा करून, त्यांना टाकरखेडा रोडवरील म्हाडाच्या घरकूल योजनेत घर देण्याचा निर्णय घेतला. 24 मार्च 17 रोजी अतिक्रमित रहिवाशांना नोटीसा देऊन, अतिक्रमण काढून घरकूल योजनेत राहण्याचे सूचित करण्यात आले होते. अखेरीत 25 रोजी पालिकेने आरोग्य विभागाचे कर्मचारी व ट्रॅक्टर साहित्य पुरवून अतिक्रमण काढीत त्यांचे साहित्य नगरपालिकेने म्हाडा घरकूलात पोहचविले.