अमळनेरात अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे स्नेहसंमेलन जल्लोषात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:17 PM2020-01-18T22:17:06+5:302020-01-19T00:27:23+5:30
अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.
अमळनेर, जि.जळगाव : येथील अॅड.ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक सनेहसंमेलन उत्साहात पार पडले.
प्रांताधिकारी सीमा आहिरे यांनी उद्घाटन केले. तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, संस्थेच्या अध्यक्षा अॅड.ललिता पाटील, सचिव प्रा.श्याम पाटील, संचालक पराग पाटील, संचालक प्रा.देवेश्री पाटील, प्राचार्य विकास चौधरी, प्राचार्य प्रकाश महाजन, प्रशासन अधिकारी अमोल माळी प्रमुख अतिथी होते.
शाळेतील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविणाºया विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सी.बी.एस.ई माध्यमाच्या शाळांसाठी ट्रेनर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य विकास चौधरी यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गितांवर नृत्य करत तथा विविध सादरीकरणातून केले. अनेक सामाजिक संदेश देण्यात आले. त्यास चांगली दाद मिळाली.
अॅड.ललिता पाटील यांनी संस्थचे कार्य व भविष्यातील योजनांबद्दल माहिती देत विद्यार्थ्यांना उच्च व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सदैव कटिबद्ध असण्याचा विश्वास उपस्थितांना दिला. शारदा महिंद, सानिका पवार, वैष्णवी पाटील, करीना पाटील, रोनीत पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रशासन अधिकारी अमोल माळी यांनी आभार मानले.