अमळनेर शहरातील स्मारके बनली सामाजिक ऐक्याची प्रतीके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 09:34 PM2019-09-14T21:34:10+5:302019-09-14T21:34:15+5:30
अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची दानभूमी म्हणून अमळनेर शहर ओळखले जाते. या शहरात ...
अमळनेर : संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी, सानेगुरुजींची कर्मभूमी, श्रीमंत प्रताप शेठजींची दानभूमी म्हणून अमळनेर शहर ओळखले जाते. या शहरात सामाजिक ऐक्य टिकून राहण्यासाठी विविध चौकांमध्ये सर्व समाजाच्या थोरपुरुष, संत व क्रांतिकारकांच्या स्मारकांची नगरपालिकेने केलेली उभारणी निश्चितच प्रेरणादायी ठरली आहे.
येणा?्या पिढीला थोर पुरुषांची माहिती असावी आणि समाजिक ऐक्य टिकून राहावे म्हणून जि प विश्रामगृहासमोरील महाराणा प्रताप स्मारक, बसस्थानकाजवळचे अहिल्याबाई होळकरांचे स्मारक, तसेच अण्णाभाऊ साठे, संत भीमा भोई, रुबजी नगरमध्ये एकलव्य यांचे स्मारक, शाहआलम नगरमध्ये टिपू सुलतान, कुंटे रोडवरील संत शिरोमणी सेनाजी महाराज यांच्यासह काशीबा गुरव, वासुदेव जोशी, क्रांतिवीर समशेरसिंग पारधी, पैलाडमधील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, तर दगडी दरवाजाजवळ संत नरहरी महाराजांचे स्मारक, गाधलीपुरा भागात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, पोस्ट आॅफिसजवळ अग्रसेन महाराजांचे स्मारक, व्हाइट बिल्डिंगजवळ डॉ.सय्यद मोहम्मद बुरानोद्दीन, उड्डाण पुलाजवळ ब्राह्मण भगवान परशुराम यांचे स्मारक आहे. पाचपावली मंदिराजवळ संत गाडगेबाबा, स्वामी नारायण चौक, साईबाबा चौक, बालवीर चौक, शहीद हेमुसिंग कलानी मार्ग अशी स्मारके शहरात सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवितात.
नगराध्यक्षा, मुख्याधिकारी यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी एकमताने ठराव मंजूर करून महापुरुषांच्या नावांनी शहरात चौक, स्मारके उभारून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.