अमळनेरला रंगला राजकीय आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 08:16 PM2019-05-07T20:16:53+5:302019-05-07T20:17:02+5:30

पाणीप्रश्न: आजी व माजी आमदारांमध्ये ‘चकमक’

Amalner government colored roundabout | अमळनेरला रंगला राजकीय आखाडा

अमळनेरला रंगला राजकीय आखाडा

googlenewsNext


अमळनेर : अक्षय तृतीयेला बोरी नदी पात्रात सकाळी पाण्याच्या प्रश्नावरून आजी व माजी आमदारांच्या गटात प्रसाद महाराजांच्या समोरच राजकीय आखाडा रंगल्याने पुन्हा एकदा राजकारण्यांमध्ये मारामारी होती का? अशी भीतीही यावेळी निर्माण झाली होती. मात्र भाविकांची चांगलीच करमणूक होऊन चर्चेस उधाण आले होते.
दरवर्षी अक्षय्य तृतीयेला समाधी मंदिरासमोर एैलाड व पैलाड मधील महिला एकमेकांना शिव्या देण्याची परंपरा आहे. यंदा मात्र संत सखाराम महाराज यात्रोत्सावाचा ध्वजारोहण व स्तंभारोपण या धार्मिक कार्यक्रमात राजकीय चर्चेतून झालेल्या आजी माजी आमदारांमधील शाब्दिक वादामूळे आखाजीचा आखाडा सायंकाळ ऐवजी सकाळीच रंगला
अन्नपूर्णा खांबांची पूजा होत असताना प्रसाद महाराजांसमोर सर्व अधिकारी राजकीय नेते बसलेले असताना प्रसाद महाराजांनी सर्वांसमक्ष सांगितले की, सखाराम महाराज समाधी द्विशताब्दी महोत्सवात साहेबराव पाटलांनी पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती आणि त्याच क्षणाला हा सूर पकडून त्यांनी शेजारीच बसलेल्या आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे कटाक्ष टाकून लोकमतच्या बातमीचा संदर्भ देत म्हटले की, याना सांगा हे टीका करतात. त्याचवेळी शिरीष चौधरी म्हणाले की, आता अमळनेरच्या जनतेला व्यवस्थित पाणी पुरवठा करा. तेव्हा साहेबराव म्हणाले की, पाडळसरे धरणाला निधि आणायची बोंब पडली नाही ते कोणामूळे बंद पडले ते पहा... ते आमदारांचे काम होते. त्यावर आमदार शिरिष चौधरी म्हणाले की, आता तूम्ही जे कलाली डोहातून पाणी घेवून शहराला पूरवठा करतात त्या तात्पूरत्या कलाली पाणी योजनेला तूम्हीच विरोध केला होता.
यावेळी पाणी प्रश्नावर दोघांमध्ये चांगलाच शाब्दिक वाद रंगला. पुन्हा शिरीष चौधरी गटाचे गटाचे विरोधीपक्ष नेते प्रवीण पाठक (ज्यांनी नगराध्यक्षसह नगरसेवक अपात्रतेचा प्रस्ताव सादर केला आहे ) म्हणाले की, आता तूम्ही जवढे दिवस आहात तेवढे दिवस तरी शहराला पूरेसा पाणी पूरवठा करा. हा टोमणा मारल्याने साहेबराव पाटील चांगलेच चिडल. तू कोण माझी मुदत ठरवणारा... असे म्हणत मध्ये बोलू नको चांगल्या कामासाठी आलोय आणि तशी इच्छा असेल तर हा कार्यक्रम सोडा आणि या मग बाजूला नदी पात्रात असे आव्हानच साहेबराव पाटील यांंी उठून दिले. दोघांमधील शाब्दिक चकमक वाढत चालली असताना धार्मिक कार्यक्रमाचा राजकीय आखाडा होऊन पुन्हा एकदा शहराची बदनामी होऊ नये म्हणून प्रसाद महाराजांनी दोघांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यावेळी प्रवीण पाठक यांनी गमतीचा विषय सुरू असून साहेबराव दादानी मनाला लावून घेतल्याचे कबुल केले. यावर साहेबराव पाटील म्हणाले की, मी आणि आमदार चर्चा करत असताना माझ्या गटातील कोणीच बोलत नाही, तू बोलू नको, आमदार बोलतील असे सांगितले. त्यांनतर काही चाणाक्ष उपस्थितांनी ‘बोला सखाराम महाराज की जय’ च्या घोषणा देऊन विषयाला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला नंतर अनिल भाईदास पाटील यांनी चर्चेत भाग घेऊन हे सपाट पायाचे सरकार आहे ना म्हणून असे होतेय ना ? असे म्हणत साहेबराव पाटलांना चिमटा काढला. तेव्हा शिरीष चौधरी यांनी मी आधी पासून सहयोगी आहे. साहेबराव पाटील नंतर का आले भाजपात असे ते म्हणाले आणि पुन्हा चर्चा रंगली. पुन्हा महाराजांनी शांत राहण्याचे आवाहन केल्यानंतर साहेबरावानी शांतता घेत वाद सुरू राहतात आम्ही सर्व एकत्र आहोत, असे म्हणत शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांच्या खांद्यावर हात टाकला नंतर प्रसाद महाराजांसह सर्व स्तंभरोपण साठी समाधी मंदिरासमोरील मंडपात आले. त्या ठिकाणी राजकिय कट्टर वैरी भाजपा जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँक संचालक अनिल भाईदास पाटील शेजारी शेजारी बसले. त्यावर शाब्दिक कोटी करीत ऊदय वाघ माझे डावे तर माजी आमदार साहेबराव पाटील ऊजवे असल्याचे सांगून पून्हा धार्मिक कार्यात राजकीय चचेर्ला तोंड फोडले. परत अधून मधून राजकिय चर्चा होत असतांना संत सखारामांचा जयघोष करीत विषय टाळण्यात आला. नंतर साहेबराव पाटील यांनी प्रवीण पाठक यांच्या तोंडात बत्तीसा देऊन गोड वातावरण करण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय वाद शमल.े एकंदरीत या धार्मिक आखाड्यात शहराच्या पाणी प्रश्नावर राजकिय चर्चा रंगल्यामूळे आखाजीला सांयंकाळी नदी पात्रातील महिलांच्या प्रेम व मित्रत्वाच्या भावनेत शाब्दिक चकामक पाहण्याप्रमाणे आंनद राजकीय नेत्यांच्या माध्यमातून सकाळीच भाविकांना बघायला मिळाला.

वादातील चचेर्नंतर साहेबराव पाटलांनी आमदार शिरीष चौधरी व अनिल भाईदास पाटील यांचं खांद्यावर हात टाकून आमच्यात वाद नाहीत असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शेजारी माजी नगराध्यक्ष विनोद पाटील व मागे भगवा शर्ट घातलेले प्रवीण पाठक
छाया अंबिका फोटो

Web Title: Amalner government colored roundabout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.