अमळनेर पालिकेने दिली गॅरेज मालकांना तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:32 PM2019-09-10T20:32:58+5:302019-09-10T20:33:03+5:30
अमळनेर : येथील कुंटे रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिकेने चार मोटारसायकली जप्त करून अतिक्रमण हटवले. तसेच ...
अमळनेर : येथील कुंटे रोडवरील रस्त्यावरील अतिक्रमणाबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच नगरपालिकेने चार मोटारसायकली जप्त करून अतिक्रमण हटवले. तसेच गॅरेज मालकांना तंबी दिली.
कुंटे रोडवर काही दुकानदारांनी आपल्या व्यवसायासाठी अर्ध्याच्या वर रस्ता व्यापला होता. त्यामुळे नागरिकांना या रस्त्यावरून सायकलवर अथवा पायी चालणेदेखील अवघड झाले होते. याबाबत नागरिकांनी कारवाईबाबतची अपेक्षा व्यक्त केली होती. ‘लोकमत’ने ९ रोजीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी राधेश्याम अग्रवाल, यश लोहरे, सुरेश चव्हाण, राकेश बि?्हाडे, चंदू बि?्हाडे, जयदीप गजरे, अविनाश बि?्हाडे, विशाल सपकाळे यांनी अतिक्रमणस्थळी जाऊन गॅरेजचालकाने रस्त्यावर इतरत्र लावलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या. तसेच गॅरेज चालकांना यापुढे अतिक्रमण केल्यास पालिकेतर्फे दुकानांना सील लावले जाईल, अशी तंबी दिली. गॅरेज चालकांनी देखील अतिक्रमित वाहने हटवून घेतली.