अमळनेर पालिका देणार पाणी शुद्ध करणाऱ्या गणेश मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:34 AM2021-09-02T04:34:52+5:302021-09-02T04:34:52+5:30
अमळनेर : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने अभिनव उपक्रम हाती घेतला असून आता पाणी शुद्ध करणाऱ्या ...
अमळनेर : माझी वसुंधरा अभियान अंतर्गत जल प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने अभिनव उपक्रम हाती घेतला असून आता पाणी शुद्ध करणाऱ्या तुरटी(ऍलम) पासून बनवलेल्या मूर्ती ना नफा ना तोटा तत्त्वावर उपलब्ध केल्या आहेत.
शाडूच्या मातीपासून बनवलेल्या मूर्तींनादेखील रासायनिक रंग असतात आणि त्यामुळे नद्या, नाले, विहिरीमध्ये प्रदूषण वाढून पर्यावरणाचा ऱ्हास होतो. म्हणून सागरी जैव विविधता, जलस्रोतांचे संवर्धन, व संरक्षण करण्यासाठी नगरध्यक्षा पुष्पलता पाटील व मुख्याधिकारी यांनी पाणी शुद्ध करणाऱ्या तुरटीपासून बनवणाऱ्या मूर्ती उपलब्ध करून गणेश विसर्जनानंतर पाणीसाठे शुद्ध होतील, अशी संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी याच तुरटीच्या सुबक व आकर्षक मूर्ती ना नफा ना तोटा तत्त्वावर खरेदी करून पर्यावरण संवर्धनास हातभार लावावा, यासाठी शहर अभियान व्यवस्थापक चंद्रकांत मुसळे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.