अमळनेर पोलीस ठाण्यातर्फे पोलीस पाटलांना काठी, शिटी वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:55 PM2019-01-20T16:55:43+5:302019-01-20T16:56:11+5:30
सेवानिवृत्तांचा सत्कार
अमळनेर : तालुक्यातील महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्यावतीने सेवानिवृत्त पोलीस पाटीलांचा सत्कार सोहळा उत्साहात झाला. या वेळी १०० पोलीस पाटलांना काठी, शिटीचे वाटप करण्यात आले तसेच एक गाव - एक गणपती राबविणाºया ४१ पोलीस पाटीलांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद््घाटन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी रफिक शेख होते तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर, सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान पाटील, सहायक पोलीस निरीक्षक, एकनाथ ढोबळे, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे, कार्याध्यक्ष भाऊसाहेब पाटील, तालुका पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक पाटील, विलास पाटील, दिनेश पाटील यांच्यासह जिल्हातील पदाधिकारी व तालुकाध्यक्ष उपस्थित होते. प्रास्ताविक संघटनेचे उल्हास लांडगे, प्रविण गोसावी यानी केले. पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात प्रथमच उपक्रम
अमळनेर पोलीस ठाण्याच्यावतीने उपस्थितांच्याहस्ते १०० पोलीस पाटलांना काठी, शिटीचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच असा उपक्रम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले. यासोबतच निवृत्त पोलीस पाटीलांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक गाव - एक गणपती राबविणाºया ४१ पोलीस पाटीलांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी गोविंदा पाटील, गोकूळ गायकवाड, भानुदास पाटील, लखीचंद पाटील, सुभाष पाटील, विलास पाटील, प्रताप संदानशीव, सुनंदा खैरनार, कविता पाटील आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन पो.कॉ. शरद पाटील यांनी केले तर संदीप पाटील यांनी आभार मानले.