अमळनेरात राजकारण्यांनी एकत्र येऊन केली दूध संघाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 09:38 PM2019-08-02T21:38:33+5:302019-08-02T21:39:51+5:30

अमळनेर तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे.

In Amalner, politicians came together and formed a milk union | अमळनेरात राजकारण्यांनी एकत्र येऊन केली दूध संघाची स्थापना

अमळनेरात राजकारण्यांनी एकत्र येऊन केली दूध संघाची स्थापना

Next
ठळक मुद्देतापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास मिळाली शासनाची परवानगीराजकारणी झाले एकत्रसर्वपक्षीय दूध संघाच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे गोकुळ बोरसे तर कार्याध्यक्षपदी भाजपचे महेश पाटील

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सुरू केलेल्या दूध संघास शासनाने हिरवा कंदील दिला असून कृषी,पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाने तापी सहकारी दूध व प्रक्रिया सहकारी संघास दूध संकलन व बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शेतीपूरक दुग्धव्यवसाय करण्यास चालना मिळून शेकडो भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत सवार्नूमते हा दूध संघ स्थापन करण्यास मान्यता मिळाल्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी आमदार स्मिता वाघ यांची मुख्य प्रवर्तक म्हणून निवड करून त्यांच्यावर पुढील जवाबदारी टाकण्यात आली होती. त्यानुसार वाघ यांनी प्रस्ताव तयार करून महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्रालयाकडे सुपूर्द केला होता.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व भाजप नेते उदय वाघ यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय दूध उत्पादकांची बैठक घेण्यात आली. यात आमदार वाघ व उदय वाघ यांनी संस्थेत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांंना संचालक म्हणून स्थान देण्याची भूमिका मांडली. यानुसार संघाच्या चेअरमनपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ नामदेव बोरसे (गडखांब), व्हाईस चेअरमनपदी अमळनेर येथील उद्योजक महेंद्र सुदाम महाजन तर कार्याध्यक्षपदी महेश उत्तमराव पाटील (लोण) यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर दूध संघाचे धोरण ठरविण्यात आले.
बैठकीतील निर्णयानुसार असे असेल दूध संघाचे धोरण
तापी सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघामार्फत सहा महिन्यांत दूध संकलन प्रकल्प क्षमता १० हजार लीटरपर्यंत करण्यात येणार आहे. तालुक्यात १० एकर जागेत प्रकल्प उभारला जाईल. दूध संघ कार्यान्वित झाल्यानंतर दीड हजार युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळग्रस्त बळीराजा साठी सदर दूध संघ आशेचा किरण ठरणार आहे. दूध संघामार्फत ग्रामीण दूध उत्पादक संस्थांचे बळकटीकरण व महिला बचत गटांचे सक्षमीकरण करून दूध संकलन करण्यात येणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संघामार्फत शुद्ध व सुगंधी दुग्ध पदार्थांची निर्मिती करणे, त्याचप्रमाणे मिनरल वॉटर बॉटल प्लांट, पशुखाद्य उद्योग, इतर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच सदर प्रकल्पासाठी खुल्या आवाहनाद्वारे २५ हजार सभासद करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन कोटी ५० लाख सभासद भागभांडवल वसूल करण्याचे उद्दिष्ट आहे. एनडीडीबीमार्फत शासकीय अनुदान १७ कोटी ५० लाख आणि उर्वरित भांडवल दीर्घ मुदतीचे बँक कर्ज रु. पाच कोटी असा एकूण २५ कोटींचा हा प्रकल्प असणार आहे.
बैठकीत बाजार समिती सभापती प्रप्फुल पवार, जि.प.सदस्या मीना पाटील, उपसभापती श्रावण ब्रम्हे, कृ.उ.बा.संचालक सुरेश पिरन पाटील, माजी नगरसेवक राजू फाफोरेकर, काशिनाथ चौधरी, गिरीश सोनजी पाटील, देखरेख संघ चेअरमन विक्रांत पाटील, मार्केटचे माजी संचालक कामराज पाटील, भटा पाटील, रामकृष्ण पाटील, विठोबा महाजन, भगवान कोळी, शेतकी संघ माजी संचालक प्रा.श्याम पाटील, जितेंद्र राजपूत, गुलाबराव पर्वत पाटील, विजय कहारू पाटील, शिवसेनेचे किरण पवार, सचिन योगराज पाटील, भाजप शहराध्यक्ष शीतल देशमुख, सरचिटणीस जिजाबराव पाटील, एम डी.चौधरी, महेंद्र बोरसे, मधुकर कथ्थू पाटील, सदस्य नोदणी प्रमुख निवास मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: In Amalner, politicians came together and formed a milk union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.