अमळनेर पं. स. बैठकीवर सदस्यांचा बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 03:48 PM2019-05-28T15:48:25+5:302019-05-28T15:48:35+5:30
अधिकाऱ्यांची दांडी : कारवाई करण्याची मागणी
अमळनेर : तालुक्यातील पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पंचायत समितीच्या मासिक बैठकीस ग्रामसेवक आणि बहुसंख्य अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने संतप्त पंचायत समिती सदस्यांनी गैरहजर कर्मचारी आणि अधिकाºयांवर कारवाईची मागणी करत बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
याबाबत दखल घेत सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी अनुपस्थित ग्रामसेवक आणि कर्मचाºयांना नोटीस बजावणार असल्याचे सांगितले.
सध्या तालुका दुष्काळात होरपळत आहे. ५३ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. ३५ गावांना विहीर अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. अजूनही बºयाच गावांची टँकरची मागणी आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी मासिक बैठक आयोजित केली होती.
बैठकीस पंचायत समिती सदस्य विनोद जाधव, निवृत्ती बागुल, प्रवीण पवार यांच्यासह सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ हजर होते. मात्र गावाची जबाबदारी सांभाळणारे ग्रामसेवक व अनेक अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने संतप्त सदस्यांनी गैरहजर कर्मचाºयांवर कारवाई करा, अशी मागणी करत बैठकच रद्द केली.
बैठकीला या अधिकाºयांनी मारली दांडी
तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती अभियंता, बांधकाम उपविभागीय अभियंता, लघुसिंचन अभियंता, यांच्यासह ग्रामसेवक अनुपस्थित होते.
कृषी कार्यालयातही एकही अधिकारी नाही
दुसरीकडे तालुका कृषी कार्यालयात एकही अधिकारी हजर नव्हता. मे महिन्यात कृषी विषयी विचारणा करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना रिकाम्या हाती परत जावे लागत आहे. कृषी सहायक, मंडळाधिकारी, आणि कर्मचारीच नसल्याने कार्यलयात फक्त रिकाम्या खुर्च्या पडलेल्या असतात. एकंदरीत तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचाºयांवर वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याने जनतेचे हाल होत आहेत.