कोकण पूरग्रस्तांच्या मदतीला अमळनेर सरसावलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:16 AM2021-07-30T04:16:24+5:302021-07-30T04:16:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : कोकण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर येथून मदतीचे हात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : कोकण येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अमळनेर येथून मदतीचे हात पुढे सरसावले आहेत. कोकणात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो जनावरे मृत्युमुखी पडले, तर अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणातील संकटाच्या पार्श्वभूमीवर स्वतःचा वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार माजी आमदार साहेबराव पाटील यांनी कोकणातील लोकांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री निधीला ५१ हजार रुपयांचा धनादेश आणि नगरपरिषदेतर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी २१ हजार रुपयांचा धनादेश प्रांताधिकारी सीमा अहिरे यांच्याकडे सुपुर्द केला.
यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, विक्रांत पाटील, सेनेचे शहरप्रमुख संजय पाटील, उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, सरपंच सुरेश पाटील, संजय चौधरी, ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते.