अमळनेरला सुरू झाला सावित्रीच्या लेकींचा धमाकेदार जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 09:22 PM2020-01-03T21:22:48+5:302020-01-03T21:23:42+5:30

पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला.

Amalner started the raging feud of Savitri lakes | अमळनेरला सुरू झाला सावित्रीच्या लेकींचा धमाकेदार जागर

अमळनेरला सुरू झाला सावित्रीच्या लेकींचा धमाकेदार जागर

Next
ठळक मुद्देस्त्री भ्रूणहत्या विरोधात सर्वसंमतीने झाला ठरावपालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टचा उपक्रम

अमळनेर, जि.जळगाव : पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तृतीय वर्षीय 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला.
माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील, डॉ.अनिल शिंदे, नगरसेवक प्रवीण पाठक, निशांत अग्रवाल, विक्रांत पाटील, संजय चौधरी, प्रमुख अतिथी बेटी बचाव आंदोलनाच्या राष्ट्रीय संघटक डॉ.सुधा कांकरिया, झेप उद्योगिनीच्या संचालिका पौर्णिमा शिरीषकर, स्वयंशक्तीच्या संचालिका दीपाली चांडक, ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा मुठे, उपाध्यक्ष तिलोत्तमा पाटील, कांचन शाह, सरोज भावे व सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या उपस्थितीत विविध घोषवाक्ये लिहिलेले छोटे फलक गॅसच्या फुग्याच्या सहाय्याने हवेत सोडून महोत्सव व त्यानिमित्ताने लागलेल्या ७० स्टॉल्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड.मीनाक्षी राठोड यांनी सादर केलेले 'घुमर... घुमर...' गाण्यावरील नृत्य व नेहा देशपांडे आणि विवेक नाईक संचालित नादब्रह्म हे महिलांचे ढोल पथक लक्षवेधी ठरले.
व्यासपीठावर प्रमुख अतिथींसह ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नयना कुलकर्णी यांनी साधना राधना या गाण्यावर केलेल्या नृत्याने चांगली दाद मिळविली. येथील पहिल्या महिला प्राचार्या डॉ.ज्योती राणे यांचे प्रताप महाविद्यालयास ए प्लस नॅक दर्जा मिळविण्यासाठीचे योगदान तसेच त्यांची नॅक समिती सदस्यपदी झालेली निवड याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बालिका दिनानिमित्त डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या बालिका व त्यांच्या मातांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रास्ताविक करताना डॉ.मुठे यांना महिलांवरील अत्याचार व स्त्री भ्रूण हत्येच्या विषयावर अश्रू अनावर झाले .
डॉ.कांकरिया म्हणाल्या की, स्त्री जगली, शिकली व स्वत:च्या पायावर उभी राहिली तर ती दारिद्र्य निर्र्मूलनाची पहिली पायरी ठरेल. गेल्या वर्षी दीड कोटी स्त्री भ्रूण हत्या झाल्या. जगात सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या भारतात होतात. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो. हा एक प्रकारचा मुका दुष्काळ आहे. आईचे उदर तीर्थक्षेत्र असते, मात्र त्यास सर्रास स्मशानभूमी करणे सुरू आहे.
डॉ.कांकरिया यांनी सर्वांना स्त्री भ्रूण हत्येविरोधात शपथ दिली. ट्रस्टतर्फे डॉ.मुठे यांनी स्त्री भ्रूण हत्येविरोधात मांडलेल्या ठरावास सर्वसंमतीने मंजुरी देण्यात आली.
दीपाली चांडक व पौर्णिमा शिरीषकर यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या सहाय्याने उपस्थित महिलांशी संवाद साधला. गरिबी परिस्थितीची नसते तर विचारांची असते, असे सांगून त्यांनी महिलांना स्थानिक पातळीसह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी उद्योजिका होण्यासाठीचे मार्गदर्शन केले.
मोहिनी खाडिलकर व भारती पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
 

Web Title: Amalner started the raging feud of Savitri lakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.