अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 12:13 PM2020-08-17T12:13:25+5:302020-08-17T23:41:24+5:30

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे  जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम ...

Amalner, a warning to the riverside villages in Chopda taluka | अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Next

पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग : गिरणा धरण ५२ टक्क्यांच्यापुढे 

जळगाव : गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली पावसाची रिमझिम सुरूच असून वेळेवर आलेल्या या या पावसामुळे कपाशीसह उडीद, मूग व इतर पिकांना फायदा झाला आहे. मात्र आता आणखी हा भिज पाऊस असाच सुरू राहिला तर बुरशी लागण्याचीही भीती शेतकºयांमधून व्यक्त केली जात आहे.  या पावसामुळे धरण साठ्यातही वाढ होत असून गिरणा धरणाची पाणी पातळी ५२ टक्क्यांच्या पुढे गेली असून हतनूर धरणातही पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे १४ दरवाजे अजूनही उघडेच आहेत. दुसरीकडे पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणात पावासाच्या सरी सुरूच असून रविवारीदेखील दिवसभर सूर्यदर्शनही झाले नाही. 
गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देत असलेल्या पावसाचे मंगळवारी पुनरागन झाले. त्यानंतर बुधवारी रात्रीपासून सलग पाऊस   सुरूच आहे. या पावसामुळे जिल्हाभरातील बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे पिके तरारत असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. मात्र आता हा पाऊस आणखी काही दिवस सुरूच राहिला तर कपाशीसह, उडीद, मूग व इतर पिकांनाही बुरशी लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

गिरणा धरणाच्या साठ्यात वाढ
गिरणा धरणाच्या पाणी साठ्यात या पावसामुळे वाढ होऊन धरण साठा  ५२ टक्क्यांच्यापुढे गेला आहे. धरणात ५२.१ टक्के पाणीसाठा झाला असून वाघूर धरणात ८७.४२ तर हतनूर धरणात १८.९० टक्के पाणीसाठी झाला आहे. 

हतनूर १४ दरवाजे उघडेच
हतनूर क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणाचे १४ दरवाजे अजूनही पूर्ण उघडचेच आहे. धरणात येणाºया पाण्याचा वेग पाहता १४ आॅगस्ट रोजी धरणाचे ३६ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले होते. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने दरवाजे बंद करण्यात आले. यात रविवारी  १४ दरवाजे पूर्ण उघडे होते. त्यामुळे धरणातून ३१ हजार २२३ क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे तापी नदीपात्रात पाण्याची आवक सुरूच आहे.  
  
पांझरा पात्रात वाढणार विसर्ग
 
पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
धुळे पाटबंधारे विभाग, धुळे अंतर्गत असलेल्या  मालनगाव मध्यम  प्रकल्प (ता. साक्री) व जामखेडी मध्यम प्रकल्प १०० टक्के क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतून अनुक्रमे १६१०  व ४१९  क्युसेक्स वेगाने विसर्ग पांझरा नदी पात्रातून अक्कलपाडा मध्यम प्रकल्पात सुरू आहे. त्यामुळे निम्न पांझरा (अक्कलपाडा) मध्यम प्रकल्पाचे रविवारी सकाळी ९ वाजता दोन दरवाजे अर्धामीटरने  उघडण्यात आले असून  २०८० क्युसेक्स विसर्ग पांझरा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे आवश्यकतेप्रमाणे पाण्याचा विसर्ग वाढविला जावू शकतो. त्यामुळे पांझरा नदी काठावरील अमळनेर, चोपडा तालुक्यातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन  जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
 

Web Title: Amalner, a warning to the riverside villages in Chopda taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव