अमळनेर पंचायत समितीच्या कारभाराबाबत कारवाईचा प्रस्ताव पाठविणार - पंचायत राज समितीचे ताशेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:27 PM2017-10-26T13:27:06+5:302017-10-26T13:44:27+5:30
समितीने घेतला पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, स्वच्छतेचा आढावा
संजय पाटील, महेंद्र रामोसे / ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 26 - जळगाव दौ:यावर असलेल्या पंचायत राज समितीच्या सदस्यांनी गुरुवारी अमळनेर तालुक्यात भेट देऊन तेथील विविध विभागाचा आढावा घेतला. यामध्ये अमळनेर येथे गटविकास अधिका:यांना स्वत:चा पगार तसेच पंचायत समितीचे उत्पन्न सांगता आले नाही. सर्व विभागाच्या अहवालाबाबत अधिका:यांना उत्तर देता आले नाही. या पं.स.चा कारभार बरोबर नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचे समितीने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जळगावहून येताना म्हसले , टाकरखेडा, कुरहे खु या गावांना भेटी देऊन पाणी पुरवठा योजना तसेच ग्रामपंचयतींच्या दप्तरी तपासणी केली.
कु:हे खुर्द येथे 2007ची पाणी पुरवठा योजना प्रलंबित होती तत्कालीन समितीने 40 टक्के काम करून पैसे काढून घेतले होते. त्यानंतर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ठेकेदार बदलवून योजना पूर्ण केली असून त्यात पाणी जोडणे बाकी आहे. या कामाची समितीने पाहणी व मोजणी करून कामाबाबत समाधान व्यक्त केले. मात्र एका महिन्यात पाणी सुरू करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. ग्रामपंचायत दप्तराचे तपासणी करून समितीने ग्रामसेवका पंचायत समितीमध्येमध्ये बोलावले.
टाकरखेडा येथे पाणी टंचाई असल्याने नवीन योजनेचा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना समितीने केल्या. ग्रामपंचायतीत स्वच्छतेची पाहणी करून ग्रामस्थांना बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. ग्रामसेवक बाबत काही तक्रारी आहेत का असेही विचारले, मात्र आरोग्य केंद्रात औषधी नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यामध्ये वरिष्ठ पातळीवरून औषधी येत नसल्याचे समोर आले. प्राथमिक शाळेतही जाऊन चौकशी केली पोषण आहाराचा अहवाल घेतला. म्हसले येथे पाणी पुरवठय़ाचा अहवाल घेऊन पाणी मिळते की नाही याची चौकशी केली. यानंतर समिती अमळनेर येथे पोहचली. या ठिकाणी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय पाटील, सुशील भदाणे आदींनी वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत निवेदन दिले. त्यानंतर जानवे येथील बाळू मिस्त्री यांनी समस्यांबाबत ग्रामसेवक ऐकत नाही अशी तक्रार केली. समितीने सर्व विभागांचा बंद द्वार अहवाल घेतला. नंतर जानवे येथील तक्रारदार व ग्रामसेवक यांना समक्ष बोलावण्यात आले स्वच्छते बाबत संबंधित अधिका:यांची कानउघडणी केली.
समितीत आमदार विक्रम काळे, दत्ता सामंत, श्रीकांत देशपांडे, प्रकल्प संचालक विक्रांत बगाडे, अशोक पटाईत, डी.जी. तांबोळी, सुनील मोरे, धीरज बोरसे यांचा समावेश आहे.