अमळनेर येथे तरुणावर कु-हाडीने वार, गंभीर जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:53 PM2017-11-29T12:53:02+5:302017-11-29T12:55:57+5:30
आपसात वाद
ऑनलाईन लोकमत
अमळनेर, जि. जळगाव, दि. 29 - अमळनेर येथे दोन जणांमध्ये वाद होऊन झालेल्या भांडणात समाधान शिंदे व इतर चौघांनी अनिल प्रकाश पारधी (30, रा. अमळनेर) यांच्यावर कु-हाडीने वार केले. डोक्यात जबर मार बसल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शहरातील पारोळा रोडवर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अनिल पारधी व समाधान शिंदे यांच्यामध्ये आपसात वाद झाले. त्यानंतर समाधान शिंदे याने इतर चार जणांना सोबत घेत अनिलवर कु-हाडीने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.एम. पाटील यांनी उपचार केले व खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.