सामाजिक कार्यकर्त्यांचा अमळनेरात गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:20 AM2021-08-12T04:20:49+5:302021-08-12T04:20:49+5:30
कलागुरू ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी असलेले डॉ. सुरेश खैरनार यांनी कोविड १९ मध्ये कोरोना रुग्णांना अहोरात्र परिश्रमपूर्वक सेवा दिल्यात. ...
कलागुरू ड्रीमसिटी परिसरातील रहिवासी असलेले डॉ. सुरेश खैरनार यांनी कोविड १९ मध्ये कोरोना रुग्णांना अहोरात्र परिश्रमपूर्वक सेवा दिल्यात. बऱ्याच रुग्णांना विशेषतः वृद्धांना घरी जाऊन धीर देत मानवता जपत सेवा दिली तर अनेक रुग्णांचे प्राण वाचविलेले आहे. तसेच आर. के. नगर व कलागुरू परिसरातील रहिवासी असलेले सेवानिवृत्त सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी मागील काही वर्षांपासून ड्रीमसिटी परिसरात अनेक झाडे लावलीत. नुसती लावली नाही तर त्यांना नियमित पाणी टाकणे, त्यांची नीगा राखणे, त्यांना लोखंडी जाळ्या लावणे अशी कामे केली. शिंदे यांच्या या पर्यावरण संवर्धनासह सातत्याने सुरू असलेल्या सेवाभावी कार्याचा गौरव म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पं. स. सभापती श्याम अहिरे यांच्यासह उपस्थित प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रफुल्ल पवार, भाजप तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील, शहर अध्यक्ष उमेश वाल्हे, सात्रीचे सरपंच महेंद्र बोरसे आदींच्या हस्ते गौरविण्यात आले. सत्कारमूर्ती यांच्या कार्याचा परिचय अविनाश पाटील, एस. टी. पाटील, दिनेश सावळे यांनी त्यांच्या मनोगतात अनुभव मांडत करून दिला. भाजप पदाधिकारी जिजाबराव आसाराम पाटील, राहुल पाटील, ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष व आरोग्यदूत शिवाजी पाटील, गोकूळ अहिरराव, मा. सरपंच संजय माधवराव पाटील, रवींद्र पाटील, कीर्तीलाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. तर ड्रीमसिटी परिवारातील रहिवासी गुलाब वाघ व गिरिजा वाघ, विश्वास बोरसे यांनीही सत्कारमूर्तींचा सत्कार केला. ड्रीमसिटी नगरचे ज्येष्ठ मार्गदर्शक रहिवासी असलेले श्रीनिवास मोरे यांची अमळनेर तालुका रेल्वे समितीवर निवड झाल्याबद्दल उपस्थित मान्यवरांसह ड्रीमसिटी परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
पाहुणे ओळख परिचय तसेच सूत्रसंचालन विक्रम शिंदे यांनी केले तर कार्यक्रम प्रस्तावना श्रीनिवास मोरे यांनी मांडली. आभार प्रदर्शन दिनेश साळवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सी. वाय. पाटील, उमेश सोनवणे यासह कलागुरू ड्रीमसिटी परिसरातील नागरिकांनी परिश्रम घेतले.