अमळनेरात संत सखाराम महाराजांचा जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 06:35 PM2018-04-26T18:35:48+5:302018-04-26T18:35:48+5:30

अमळनेरात अवतरली पंढरी : बेलापूरकर महाराजांच्या दिंडीचे आगमन; ठिकठिकाणी झाले स्वागत

Amalnerat jayjaykar of Saint Sakharam Maharaj | अमळनेरात संत सखाराम महाराजांचा जयजयकार

अमळनेरात संत सखाराम महाराजांचा जयजयकार

googlenewsNext
ठळक मुद्देअमळनेरात दोघा महाराजांची पाद्यपूजाअमळनेरात दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दीअमळनेरात दोन-तीन ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
अमळनेर, दि.२६ : संत सखाराम महाराजांचे परमशिष्य बेलापुरकर महाराज यांच्या दिंडीचे बुधवारी अमळनेरात आगमन झाले. बेलापुरकर महाराजांचे आगमन म्हणजे प्रतिपंढरपुरात पांडुरंगाचे आगमन झाले असे मानण्यात येते. टाळ मृदुंगाचा गजर व संत सखाराम महाराजांचा जयजयकार करत वारकरी येथे दाखल होताच...‘आज सोनियाचा दिनू... अशीच प्रचिती’ अमळनेरवासीयांना आली.
बेलापूरकर महाराज यांच्या गादीवरील पुरूष मोहन (मनु) महाराज हे परंपरेप्रमाणे २४ रोजी रात्रीच अमळनेरात दाखल झाले होते. २५ रोजी सकाळी साडेसहा वाजता वाडी संस्थानचे ११ वे गादी पुरूष प्रसाद महाराज यांनी शहराची वेशी गाठली. प्रसाद महाराजांनी बेलापुरकर महाराजांच्या दिंडीचे स्वागत केले. गुरूने शिष्याचे स्वागत करण्याची ही अनेक वर्षांची परंपरा आहे.
दोघा महाराजांची पाद्यपूजा
तेथे दोन्ही महाराजांचे पाद्य पुजा करण्यात आली. त्यानंतर प्रसाद महाराज व बेलापुरकर महाराज हे बैलांनी जुंपुलेल्या ‘शिग्राम’मध्ये आसनस्थ झाले. पुढे वारकऱ्यांची दिंडी, टाळ मृदुंगधारी व त्यामागे ‘शिग्राम’ चालत होता. रस्त्यात ठिकठिकाणी महाराजांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.
मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पहिली पान सुपारी आर.के.नगरच्या गणपती मंदिरात झाली. त्यानंतर दोन-तीन ठिकाणी पान सुपारीचा कार्यक्रम झाला. ठिकठिकाणी भक्तगण दर्शनासाठी गर्दी करून होते.

Web Title: Amalnerat jayjaykar of Saint Sakharam Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.