अमळनेरच्या जिल्हा बँक शाखेत ओशाळली माणुसकी

By admin | Published: June 7, 2017 01:59 PM2017-06-07T13:59:22+5:302017-06-07T13:59:22+5:30

किसान कार्डसाठी लखव्याचा रुग्ण ताटकळला दोन तास

Amalner's district bank branch, Oshalali Humanity | अमळनेरच्या जिल्हा बँक शाखेत ओशाळली माणुसकी

अमळनेरच्या जिल्हा बँक शाखेत ओशाळली माणुसकी

Next

 आॅनलाईन लोकमत/ संजय पाटील

अमळनेर,दि.७ - किसान कार्ड घेण्यासाठी रडावन येथील ७० वर्षीय लखवा झालेल्या वृद्धाला लघुशंकेच्या नळीसह दोन तास वाट बघावी लागल्याने जिल्हा बँकेच्या अमळनेर शाखेत माणुसकी ओशाळल्याचा अनुभव आला
रडावन येथील भोमा सुकलाल पाटील यांना २ महिन्यापासून लखवा झाल्याने त्यांचा एक हात व एक पाय पूर्ण निकामी झाला आहे. त्यांच्यावर आजही उपचार सुरू असून लघुशंखेसाठी नळी लावली आहे. विकासोचे कर्ज काढण्यासाठी ते आज ७ रोजी बाजार समितीत असलेल्या जिल्हा बँकेच्या शाखेत रिक्षा करून आले त्यांच्या सोबत पत्नी मंजुळा बाई , मुलगा अशोक, नातू संदीप सोबत आले होते.
 रुग्ण असल्याने त्यांचा अंगठा बाहेर येऊन घ्यावा अशी विनंती नातू संदीपने शाखा व्यवस्थापक दीपक सूर्यवंशी यांच्याकडे केली. मात्र त्यांनी रांगेत येण्यास सांगितल्याने नाईलाजाने मंजुळबाई रांगेत उभ्या राहिल्या. भोमा पाटील यांना बसता येत नसल्याने कुटुंबियांनी त्यांना रिक्षात धरून ठेवले होत. जिल्हा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाच्या माणुसकी शून्य वर्तनाची माहिती सरपंच वसंत पाटील यांनी संचालक अनिल भाईदास पाटील यांना दिली. मात्र तोपर्यंत २ तास उलटले  होते. पत्नी मंजुळबाईचा नंबर लागला आणि त्यानंतर  बँकेच्या कर्मचाºयांनी कागदपत्रांवर अंगठा घेऊन किसान कार्ड दिले. ही घटना पाहून अनेकांचे मन हेलावले, मात्र बँक कर्मचाºयांची माणुसकी ओशाळल्याचा संताप ही व्यक्त केला गेला. याबाबत व्यवस्थापक दीपक सूर्यवंशी यांना विचारले असता ते म्हणाले की, बँकेत सर्व वृद्धांच्या रांग लागली आहे. सकाळी च काउंटर वर  ग्राहकांनी काच फोडली, त्यामुळे आमचा नाईलाज होता. लोक आम्हाला शिव्या देतात. आधीच कर्मचारी कमी असल्याने आम्हालाही खूप त्रास होत आहे
मला लाज वाटते - संचालक अनिल पाटील
जिल्हा बँकेचे संचालक अनिल पाटील यांना विचारले असता ते म्हणाले कर्मचारी कमी असल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर केली आहे. मात्र तरीदेखील कर्मचारी वाढवून दिले नाहीत. शासनाचे किसान कार्ड शिवाय कर्ज देऊ नये हे धोरण शेतकºयांना मारक ठरत आहे. मात्र कर्मचाºयांना दया येऊ नये याची खंत वाटते. बँक संचालक म्हणून  स्वत: ची लाज वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत जिल्हा बँकेच्या बैठकीत आवाज उठवला जाईल.

Web Title: Amalner's district bank branch, Oshalali Humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.