अमळनेरचे डिवायएसपी राजेंद्र ससाणे यांचा कार अपघातात मृृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 04:33 PM2020-06-11T16:33:55+5:302020-06-11T16:34:09+5:30
दरीत कोसळली कार : नाशिकला घरी जाताना काळाने घातला घाला
अमळनेर : येथील पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र ससाणे हे खाजगी गाडीने नाशिक येथे घरी जात असताना त्यांची कार झाडावर आदळून १५० फूटन खोल दरीत कोसळल्याने ससाणे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत हऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना वडाळी भोई गावाच्या पुढे ११ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
राजेंद्र ससाणे हे नाशिक चे रहिवाशी होते. गुरुवार, शुक्रवार रजा व शनिवार, रविवार शासकीय सुटी घेऊन ते दवाखान्यात नियमित तपासणी करण्यासाठी नाशिकला जात होते. सकाळी १० वाजेच्या सुमारास ते अमळनेरहून निघाले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. दीड वाजेच्या सुमारास त्यांची कार वडाळी भोई जवळ झाडावर जोरात आदळली. झाड तोडून कार पुढे गेली व खालीकोसळली. घटनेचे वृत्त कळताच चांदवड टोल प्लाझा वरील कर्मचारी मयूर तेथे हजर झाला. यावेळी त्याने खिशातून ओळखपत्र काढले असता ते डीवायएसपी ससाणे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर ताबडतोब अमळनेरलाही माहिती कळली. तेथील पोलीस अधिकारी कोमलसिंग पाटील यांनी ससाणे यांचे शव विच्छेदनासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात नेले. ते अत्यंत साध्या स्वभावाचे , प्रामाणिक व न्याय देणारे अधिकारी म्हणून परिचित होते.