अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी

By admin | Published: June 14, 2017 12:53 PM2017-06-14T12:53:26+5:302017-06-14T12:53:26+5:30

अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे

Amalner's farmer: Demand for income deduction made by him | अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी

अमळनेरच्या शेतक:याने केली वजा उत्पन्न दाखल्याची मागणी

Next

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जळगाव, दि. 14 - कृषी  मूल्य आयोगाचे नियम आणि आलेल्या उत्पनाच्या अनुषंगाने ऋण उत्पन्ननाचा दाखला द्यावा अशी मागणी तालुक्यातील मंगरूळ येथील हिरालाल केशव पाटील यांनी करून शासनाला कोंडीत पकडले आहे.  अन्यथा आत्महत्येस लेखी परवानगी द्यावी असेही त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे
     हिरालाल पाटील यांच्याकडे मंगरूळ येथे सातबारा नोंदी प्रमाणे चार हेक्टर आणि 80 आर जमीन आहे. 2016-17 या आर्थिक वर्षात 60 आर ज्वारी,  30 आर बाजरी, 1 हेक्टर 30 आर कपाशी 2 हेक्टरी 20 आर कोबी अशी लागवड केली होती. त्याबाबतच्या नोंदी 7/12वर आहेत. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाच्या निश्चित केलेल्या दरानुसार लावणी, पेरणी केलेल्या शेती पिकांच्या विक्री केलेल्या उत्पन्नाचे आणि आयोगाने दर्शविलेल्या प्रति क्विंटल खर्चास अनुसरून निश्चित केलेले दर तसेच प्रति हेक्टरी अपेक्षित उत्पन्न या अनुषंगाने केलेले मूल्यांकन पाहून 2016-17 या वर्षात हिरालाल पाटील यांना एक  लाख 96, 667 एवढे  वजा म्हणजे ऋण ( निगेटिव्ह) उत्पन्न आले आहे. याबाबत त्यांनी 29 पानांचा पुरावाही सादर केला आहे.  यापैकी कोणतीही माहिती खोटी निघाल्यास भांदवि प्रमाणे कायदेशीर कारवाईस पात्र राहील अशी हमी देऊन गावरान जागल्या सेनेचे संघटक हिरालाल पाटील यांनी कागदपत्रांच्या आधारे त्यांना वजा म्हणजे ऋण एक लाख 96 हजार 667 रुपयांच्या उत्पन्नाचा दाखला मिळावा अशी विनंती नुकतीच निवेदनाद्वारे केली.  जर तसा दाखला देय होत नसेल तर राब राब राबून शेतीत तोटा येत असेल तर आपल्या स्तरावरून आत्महत्या करण्याची लेखी परवानगी मिळावी अशी मागणी करून अधिकारी आणि शासनास चकित केले आहे. उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार प्रदीप पाटील  आणि तलाठी याना निवेदन देण्यात आले आहे.
  याबाबत उपविभागोय अधिका:यांनी उत्पनाचा दाखला देण्यासाठी सक्षम अधिकारी तहसीलदार असल्याने त्यांनी कागदपत्रे पाहून योग्य कार्यवाही करावी असे निर्देश दिले आहे.
       तर तहसीलदार प्रदीप पाटील म्हणाले की वजा किंवा ऋण उत्पन्न दाखला देता येत नाही. मात्र दिलेल्या पुराव्यांची पडताळणी केली जाईल, असे सांगितले.

Web Title: Amalner's farmer: Demand for income deduction made by him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.